esakal | पतीच्या देशसेवेचा आदर्श; रुग्णांसाठी बेड उपलब्ध करून देण्याचे भावनाताईंचे व्रत

बोलून बातमी शोधा

bhavana hagavane

पतीच्या देशसेवेचा आदर्श; रुग्णांसाठी बेड उपलब्ध करून देण्याचे भावनाताईंचे व्रत

sakal_logo
By
युनूस शेख

नाशिक : दिवसातील चोवीस तास भावनाताईंच्या मोबाईलची रिंग वाजत, ‘हॅलो ताई आम्हाला तुमची मदत हवी आहे. आम्हाला बेड मिळत नाहीये. कृपया उपलब्ध करून द्या’, अशा प्रकारची आर्त हाक रुग्णांच्या कुटुंबीयांकडून दिली जाते. त्याही हाकेला ‘ओ’ देत त्यांच्या मदतीसाठी धावत असतात. त्यांच्या अशा या कार्यामुळे आज अनेकांचे प्राण वाचले आहेत.

हेही वाचा: गाजरवाडीची कृषिकन्या गाजवणार युद्धभूमी! बनली तालुक्यातील पहिली महिला फौजी

‘जनसेवा हीच ईश्वरसेवा’

‘जनसेवा हीच ईश्वरसेवा’समजून रुग्णसेवेचा वसा घेतलेल्या भावना हगवणे रुग्णांना वेळेवर उपचार मिळावे यासाठी धडपडत करता असे नाही, तर त्यांच्या कुटुंबीयांना देखील धीर देण्याचे काम त्यांच्याकडून केले जाते. त्या डॉक्टर, नर्स नसून एक सामान्य सामाजिक कार्यकर्त्या असल्याचे सांगून केवळ स्वतःला सामान्य महिला समजणाऱ्या भावनाताईंचे काम चांगल्या चांगल्यांना लाजवणारे आहे.

हेही वाचा: नाशिक ऑक्सिजन गळती दुर्घटना : पोलिस बंदोबस्तात कर्मचाऱ्यांचे जाब-जबाब

पतीच्या देशसेवेचा आदर्श; ‘जनसेवा हीच ईश्वरसेवा’चे व्रत

भावना हगवणे वडाळा रोडवरील खासगी रुग्णालयात परचेस विभागामध्ये कार्यरत आहेत. सामाजिक कार्याची त्यांना आवड आहे. सध्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेकांना बेड उपलब्ध होत नाहीत, अशा रुग्णांना त्यांच्या ओळखीतून बेड उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांच्याकडून केले जात आहे. प्रथम त्या ज्या रुग्णालयात नोकरीस आहेत त्या रुग्णालयात बेड उपलब्ध आहे किंवा नाही, याची खात्री करतात. तेथे बेड उपलब्ध असेल तर त्या रुग्णास तेथेच दाखल करून घेतात. त्याठिकाणी बेड उपलब्ध नसेल तर रुग्णास अन्य रुग्णालयात उपलब्ध करून देतात. त्याचप्रमाणे उपचारासाठी आवश्यक असलेली औषधे, रेमडेसिव्हिर इंजेक्शनदेखील त्यांच्या ओळखीतून माफक दरात रुग्णांना उपलब्ध करून देतात. कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न ठेवता केवळ सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांच्याकडून असे कार्य केले जाते. असे करत असताना त्यांना अनेक अडचणी येतात. त्यावर मात करत त्यांचे कार्य अविरत सुरू आहे.

‘हॅलो ताई आम्हाला तुमची मदत हवी आहे.

आत्तापर्यंत त्यांनी बहुतांशी रुग्णांना शहराच्या विविध रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध करून दिले. त्या मुळे त्यांना वेळेवर उपचार मिळून त्यांचे प्राण वाचण्यास मदत झाली आहे. विशेष म्हणजे दिवसातील चोवीस तास त्यांच्या मोबाईलची रिंग वाजत, ‘हॅलो ताई आम्हाला तुमची मदत हवी आहे. आम्हाला बेड मिळत नाहीये. कृपया उपलब्ध करून द्या’, अशा प्रकारची आर्त हाक रुग्णांच्या कुटुंबीयांकडून दिली जाते. त्याही हाकेला ‘ओ’ देत त्यांच्या मदतीसाठी धावत असतात. त्यांच्या अशा या कार्यामुळे आज अनेकांचे प्राण वाचले आहेत.

पतीचा आदर्श

भावना हगवणे यांचे पती आर्मीत असून, देशसेवा करीत आहेत. त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून त्या विविध प्रकारचे सामाजिक कार्य करत आहेत. असे कार्य करत असताना कुठल्याही प्रकारचे राजकारण समाजकार्यात न येऊ देता केवळ समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा मनात ठेवत त्यांच्याकडून समाजकार्य केले जात आहे.