VIDEO : रमणीय! 'हा' धबधबा म्हणजे नायगारा फॉल भासतोय जणू; इगतपुरी-भंडारदरा पर्वत रांगेतील धबधबेही खळाळले

bhivtas waterfall.jpg
bhivtas waterfall.jpg

नाशिक : सातमाळा डोंगररांगांमधील भिवतास धबधबा... 500 मीटर वरून दरीत कोसळताना पाहत असताना अमेरिका खंडातील नायगारा धबधब्याची आठवण येते...

नायगारा फॉलची आठवण करून देणारा

सातमाळा डोंगररांगांमधील भिवतास धबधबा..! पावसाळ्यात अमेरिकेतील नायगारा धबधब्याची आठवण करून देतो जणू. या धबधब्याचे पाणी पावसाळ्यात रोरावत खाली कोसळते. त्यातून होणार आवाज, उडणारे तुषार पाहणे हा एक आनंददायी अनुभव असतो. धबधब्याचे पाणी 500 मीटर उंचावरून खाली कोसळते. भिवतास धबधबा सध्या पर्यटकांचे आकर्षण बनला आहे. परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्यामुळे धबधबा ओसंडून वाहत आहे.

इगतपुरी-भंडारदरा पर्वत रांगेतील धबधबे खळाळले 

इगतपुरीला महाराष्ट्राची चेरापुंजी, पर्यटननगरी तसेच फॉग सिटी व त्याच बरोबर जवळील भंडारदरा आणि कळसुबाई ही पर्यटन पंढरी म्हणून ओळखली जाते. इगतपुरी पासून भंडारदरा- कळसुबाई जरी दुसऱ्या जिल्ह्यात असले तरी ही अवघ्या पन्नास कि.मी.अंतराला सह्याद्री पर्वत रांग जोडल्याने सह्याद्री पर्वत रांगेच्याही सौंदर्यात अधिक भर पडली आहे.

पर्यटकांना बंदी घातल्याने रोजगारावर गदा

इगतपुरीतील भावली धरण, धबधबा, अशोका धबधबा, धनुष्यतीर्थ, कावनई किल्ला, कुरुंगकिल्ला आदी प्राचीन गड, किल्ले तसेच भंडारदरा-कळसुबाई क्षेत्रातील रंधाफॉल, संधान व्हॅली, अंब्रेला फॉल, पांजरा फॉल, नानी फॉल,नेकलेस फॉल असे असंख्य धबधबे, डोंगरदऱ्या मधील छोटे- मोठे नद्या,नाले, मुसळधार पावसामुळे ओसंडून वाहू लागल्याने परिसरातील नागरिकांना ते आकर्षित करत आहेत. दरवर्षी यांचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक येत असतात. त्यामुळे इगतपुरी तालुक्यासह भंडारदरा परिसरातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध झाला होता. मात्र यंदा कोरोना महामारीमुळे खबरदारी म्हणून पर्यटनबंदी आणि आपल्या ग्रामीण भागात कोरोना चा संसर्ग होऊ नये म्हणून पर्यटकांना बंदी घातल्याने रोजगारावर गदा आली आहे.

तुडुंब गर्दी असणारे धबधबे ओस
भात शेती फुलल्याने सौदर्यात भर: इगतपुरी आणि कळसूबाई परिसरात भात शेती योग्य मुसळधार पाऊस पडल्याने भात शेती फुलून हिरवीगार झाल्याने परिसर आकर्षित झाला आहे. परिसरातील पर्यटन व्यवसाय ठप्प झाल्याने महाराष्ट्र पर्यटन निवासा सोबत छोटे- मोठे हॉटेल्स, रिसॉर्ट, लॉजिंग, घरगुती खानावळी सूनी आहेत.तुडुंब गर्दी असणारे धबधबे आज ओस पडले आहेत.त्यामुळे निसर्गसौंदर्याने नटलेला परिसर कोरोनाच्या महामारीतून लवकरच बाहेर पडेल व पुन्हा पर्यटन व्यवसाय सुरळीत होईल या प्रतीक्षेत हॉटेल चालक आहेत. वन्यजीव विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी डी. डी. पडवळ, बालिका फुंदे आदी कर्मचारी तैनात आहेत.

व्यावसायिकांसमोर समोर मोठे संकट :
पर्यटन व्यवसायाचे मोठे नुकसान झाले असून सध्याही पर्यटन बंदी असल्याने हॉटेल्स, लॉजिंग,घरगुती गावरान खानावळी, गाईड्स, हात विक्री करणारे आदी व्यावसायिकांचे लाखोंचे नुकसान झाले आहे असे येथील हॉटेल व्यावसायिक संदीप डगळे, राजू राठोड, संतोष पवार,हेमंत अवसरकर यांनी सांगितले.


पर्यटन स्थळांवर कडक बंदी घालण्यात आली आहे. कोरोना संसर्गापासून दूर राहण्यासाठी पर्यटकांना बंदी आहे तसे आढळल्यास कारवाई करण्यात येते. वनरक्षक बालिका फुंदे,आदी कर्मचाऱ्यांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.- डी. डी. पडवळ, वनपरिक्षेत्र अधिकारी, भंडारदरा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com