esakal | रेल्वेच्या अनेक महत्त्वाच्या घटनांची साक्षीदार... 'ती' इमारत झाली शंभर वर्षांची! 
sakal

बोलून बातमी शोधा

bhusaval railway.jpg

तब्बल शंभर वर्षांच्या रेल्वेच्या अनेक महत्त्वाच्या घटनांची साक्षीदार असलेली ही इमारत शंभरीनिमित्त सजविली आहे. इमारतीवर रोषणाई करण्यात आली आहे.  25 मे 1920 ला या मंडल कार्यालयाची स्थापना केली होती. येथून मध्य रेल्वेच्या संपूर्ण मंडलाचे कामकाज केले जाते.

रेल्वेच्या अनेक महत्त्वाच्या घटनांची साक्षीदार... 'ती' इमारत झाली शंभर वर्षांची! 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : तब्बल शंभर वर्षांच्या रेल्वेच्या अनेक महत्त्वाच्या घटनांची साक्षीदार असलेली ही इमारत शंभरीनिमित्त सजविली आहे. इमारतीवर रोषणाई करण्यात आली आहे.  25 मे 1920 ला या मंडल कार्यालयाची स्थापना केली होती. येथून मध्य रेल्वेच्या संपूर्ण मंडलाचे कामकाज केले जाते.

भुसावळ मंडल रेल्वे प्रबंधक कार्यालय शंभर वर्षांचे 

मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडल प्रबंधक कार्यालयाला सोमवारी (ता. 25) शंभर वर्षे पूर्ण झाली. 25 मे 1920 ला भुसावळ मंडल कार्यालयाची स्थापना केली होती. येथून मध्य रेल्वेच्या संपूर्ण मंडलाचे कामकाज केले जाते. कार्यालयात महत्त्वपूर्ण विभाग नियंत्रण कक्षातून भुसावळ मंडलाची देखरेख व नियंत्रण केले जाते. तत्कालीन अभियंता जे. एच. फॅन्शवॉ यांच्या हस्ते या इमारतीची पायाभरणी झाली होती, तर चेलाराम ऍन्ड चत्रुमल कॉन्टॅक्‍टर्स यांनी इमारतीचे बांधकाम केले होते. तब्बल शंभर वर्षांच्या रेल्वेच्या अनेक महत्त्वाच्या घटनांची साक्षीदार असलेली ही इमारत शंभरीनिमित्त सजविली आहे. इमारतीवर रोषणाई करण्यात आली आहे. 

हेही वाचा > "रेड झोन' आला आडवा...विवाहितेचा मुलासह आत्महत्येचा निर्णय..त्यावर वडिलांची युक्ती सफल!

भुसावळमध्ये 1860 मध्ये पोचली रेल्वे 
देशात 16 एप्रिल 1853 ला मुंबई ते ठाणेदरम्यान (34 किलोमीटर) भारतातील पहिली प्रवासी रेल्वेगाडी धावली. साहिब, सिंध आणि सुलतान नावाच्या तीन वाफेच्या इंजिनांनी ही गाडी खेचली आणि देशातील रेल्वे वाहतुकीला औपचारिक सुरवात झाली. त्यानंतर कोलकता ते अलाहाबाद-दिल्ली असा लोहमार्ग वाढविताना मे 1854 कल्याण, तर 1860 मध्य रेल्वे भुसावळपर्यंत येऊन पोचली. 1860 मध्ये भुसावळ रेल्वेस्थानक बांधून झाल्यानंतर शंभर वर्षांनंतर 1969 मध्ये इगतपुरी ते भुसावळ मार्गाचे विद्युतीकरण झाले. सध्या भुसावळ स्थानक उत्तर महाराष्ट्रातील सर्वांत मोठे रेल्वेस्थानक असून, विभागाचे मुख्यालय आहे. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक! घरी लग्नाची धामधूम...अन् हळदीच्याच दिवशी प्रेमीयुगुलाला अग्निडाग..पित्यावर दुर्दैवी प्रसंग..​

154 गाड्या, 115 स्थानके 
भुसावळ स्थानकातून नागपूर, इटारसी (मध्य प्रदेश), सुरत (गुजरात) पुणे आणि औरंगाबाद या मार्गासाठी रोज 154 रेल्वेगाड्या धावतात. चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मनमाड, खंडवा, अकोला, मूर्तिझापूर आणि बडनेरा जंक्‍शन स्थानकांसह भुसावळ विभागात 115 लहान-मोठी रेल्वेस्थानके आहेत. रोज 50 हजारांवर प्रवासी प्रवास करतात.  

loading image