Nashik News : अवैधरित्या दारूची तस्करी करणार्‍यांविरोधात सटाणा पोलिसांची मोठी कारवाई

Deputy Superintendent of Police Pushkaraj Suryavanshi, Assistant Police Inspector Kiran Patil, etc.
Deputy Superintendent of Police Pushkaraj Suryavanshi, Assistant Police Inspector Kiran Patil, etc.esakal

सटाणा (जि. नाशिक) : बागलाण तालुक्यात अवैधरित्या दारू विकणारे व दारूची (Liquor) तस्करी करणारे तसे अवैध व्यवसाय करणारे सध्या सटाणा पोलिसांच्या रडारावर असून व्यावसायिकांच्या मुसक्या आवळण्याचा पोलिसांनी सपाटा लावला आहे. (Big action of Satana police against illegal liquor smugglers 3 lakh 48 thousand 960 rupees seized nashik news)

सटाणा पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अवैध दारू विकणाऱ्या व दारूची तस्करी करणाऱ्यांना गजाआड करून तब्बल ३ लाख ४८ हजार ९६० रूपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

सटाणा पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पाटील यांनी तालुक्यात अवैध धंदे करणार्‍यांविरोधात आपला मोर्चा वळवला आहे. त्यामुळे अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे. विविध शकली लढवून दारूची तस्करी करणारे सध्या सटाणा पोलिसांच्या जाळ्यात अडकु लागले आहेत.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Deputy Superintendent of Police Pushkaraj Suryavanshi, Assistant Police Inspector Kiran Patil, etc.
Nashik News : NMC स्वनिधीतून तयार करणार पेठ रोड! पावणेदोन कोटी रुपयांच्या कामाचे कार्यारंभ आदेश

अवैध दारू विकणाऱ्यांबरोबरच अवैध व्यवसाय करणार्‍यांच्या पोलिसांनी कुंडल्या तयार केल्या असून त्यांच्यावर पोलिस बारीक लक्ष ठेऊन आहेत. यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.पाटील यांनी विशेष पथकेही तयार केली आहेत. इक्को मारुती सुझुकी कंपनीच्या गाडीमध्ये अवैधरित्या देशी-विदेशी दारूची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती श्री.पाटील यांना मिळताच त्यांनी तत्काळ सूत्रे हलवून नाकाबंदी केली.

शहरातील चौगाव रस्त्यावर समाधान किसन मोरकर (रा.कौतिकपाडे), अशोक दीपचंद चोपडा (रा.मित्रनगर, सटाणा) यांच्या इक्को मारुती सुझुकी वाहनाची तपासणी केली असता त्यात १ लाख ४८ हजार ९६० रुपये किंमतीची देशी-विदेशी दारू आढळून आली.

यावेळी पोलिसांनी दोघा आरोपींसह देशी विदेशी दारूची अवैधरित्या वाहतूक केली जात असलेले दोन लाख रुपये किंमतीचे इक्को मारुती सुझुकी वाहनही ताब्यात घेतले. दोघा आरोपींवर सटाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमध्ये हेड कॉन्स्टेबल पवार, पोलिस नाईक अजय महाजन, अशोक चौरे, श्री.शेवाळे, श्री.शिंदे, श्री.मोरे यांनी सहभाग घेतला.

Deputy Superintendent of Police Pushkaraj Suryavanshi, Assistant Police Inspector Kiran Patil, etc.
Grape Harvest : निफाड तालुक्यात द्राक्ष काढणीला सुरवात; पूरक व्यावसायांची उलाढाल वाढणार!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com