
बिहार निवडणुकीच्या निकालामुळे दोन दिवसांपासून हिंदी भाषिकांचे लक्ष गावाकडील निकालाकडे असल्याचे पाहायला मिळाले. हे हिंदी भाषिक मंगळवारी (ता. १०) दिवसभर टीव्हीसमोर बसले होते. त्यातील अनेकांनी नोकरीच्या पाळ्या बदलून घेत घरी निवडणुकीचा निकाल पाहिला.
गावाकडे नातेवाईक निवडणुकीत आहेत, अशांनी दांडी मारल्याचे पाहायला मिळाले.
बिहार निवडणूक निकालाचा सातपूरमध्ये फीव्हर! अनेकांनी बदलल्या नोकरीच्या पाळ्या
सातपूर (नाशिक) : बिहार विधानसभेच्या निवडणूक निकालाचा सातपूर औद्योगिक वसाहतीत फीव्हर पाहायला मिळाला. दोन दिवसांपासून निकालाच्या परिणामांचे पडसाद येथे दिसत आहेत. सातपूर-अंबड परिसरात गावाकडील निकालानंतर कुठे आनंद उत्साह, तर कुठे नैराश्याचे दर्शन घडले.
कुठे आनंद उत्साह, तर कुठे नैराश्याचे दर्शन
बिहार निवडणुकीच्या निकालामुळे दोन दिवसांपासून हिंदी भाषिकांचे लक्ष गावाकडील निकालाकडे असल्याचे पाहायला मिळाले. हे हिंदी भाषिक मंगळवारी (ता. १०) दिवसभर टीव्हीसमोर बसले होते. त्यातील अनेकांनी नोकरीच्या पाळ्या बदलून घेत घरी निवडणुकीचा निकाल पाहिला.
गावाकडे नातेवाईक निवडणुकीत आहेत, अशांनी दांडी मारल्याचे पाहायला मिळाले.
हेही वाचा > जिल्हाधिकारी चक्क कार्यालय सोडून 'जोडप्याला' भेटतात तेव्हा..!...
अनेकांचा पार्टी करून निकालाचा आनंद
सातपूर, अंबड, श्रमिकनगर, राधाकृष्णनगर, विश्वासनगर, नागरे चौक, सातपूर-अंबड लिंक रोड, भंगार बाजार, दत्तनगर, म्हाडा कॉलनी, जाधव संकुल, कामगारनगर, सीपी टूल झोपडपट्टी, संतोषी मातानगर, सातपूर राजवाडा, स्वारबाबानगर तसेच औद्योगिक वसाहतीत मोठ्या प्रमाणात उत्तरप्रदेश व बिहार राज्यातील हिंदी भाषिक मोठ्या प्रमाणावर राहतात. जसजसे निकाल येऊ लागले, तसतसा एकमेकांचा आनंद बहरत होता. त्यात अनेकांनी एकमेकांशी पार्टी व पैंजा लावल्या होत्या, तर काही जण समर्थक पक्षाचे आमदार जिंकल्यानंतर एकमेकांना शुभेच्छा देत होते, तर काही मोठ्याने घरातच घोषणा देतानाही पाहायला मिळाले. सायंकाळी संपूर्ण निकाल जाहीर झाल्यानंतर अनेकांनी पार्टी करून निकालाचा आनंद घेतला.
हेही वाचा > नाशिकच्या गुलाबी थंडीत हॅलिकॉप्टरने अचानक आमीर खानची एंट्री होते तेव्हा..!..
माझे सर्व कुटुंब या निवडणुकीसाठी गावी आहे. त्यांच्याकडून राजकीय निवडणुकीबाबत अनेक गोष्टी ऐकायला मिळत होत्या. मंगळवारच्या निकालात नितीशकुमार पुन्हा विजयी झाले; पण तेजस्वी यादव यांनी तरुणामध्ये वेगळी ओळख निर्माण केली. यामुळे भविष्यात बिहारमध्ये रोजगार उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न व्हावेत, हीच अपेक्षा. - अमर मोर्या, बिहारी नागरिक
Web Title: Bihar Election Result Fever Satpur Nashik Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..