esakal | नाशिकच्या अमरधाममध्ये अंत्यविधीसाठी आता बायोकोल बिकेट्स

बोलून बातमी शोधा

biocoal buckets in nashik amardham
नाशिकच्या अमरधाममध्ये अंत्यविधीसाठी आता बायोकोल बिकेट्स
sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : कोरोना बाधित रुग्ण संख्येत वाढ होत असताना मृत्यूच्या संख्येत देखील मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे अमरधाम मध्ये मोठ्या प्रमाणात लाकडाचा वापर होत आहे. लाकडाची गरज भागविण्यासाठी वृक्ष तोड केली जात आहे. त्यामुळे अंत्यविधीसाठी लागणाऱ्या लाकडाला पर्याय म्हणून स्वामी समर्थ बायोकोल बिकेटस् प्रा.लि.कंपनीच्या वतीने पंचवटी अमरधाम मध्ये दहा टन बायोकोल बिकेट्स चा पुरवठा करण्यात आला.

बायोकोल बिकेटस् (व्हाईट कोल) प्रदूषण रहित

पन्नास हजार किंमतीचे 10 टन बायोकोल बिकेटस् (व्हाईट कोल) प्रदान करण्यात आले. हे बायोकोल बिकेटस् शेंगा टरफल, लाकडी भुसा, मका बिट्टी, झाडांचा पालापाचोळा या पासून बनविल्या जाते. त्यांची ज्वलन क्षमता हि लाकडापेक्षा जास्त असून जाळल्यानंतर कार्बन डाय ऑक्साईड तयार होत नाही म्हणजेच प्रदूषण होत नाही, आणि म्हणून सध्याची परिस्थितीती लक्षात घेता या कंपनीने नाशिक मनपाच्या अमरधाममधे बायोकोल बिकेटस् दिले आहे.या कंपनीचे संचालक सचिन मोहिते, प्रकाश भोये, मधूसुदन वाडे यांनी सामाजिक बांधिलकी या भावनेतून हि मदत केलेली आहे. आज पहिल्या टप्यात त्यांनी 10 टन बायोकोल बिकेटस् दिले आहे.

हेही वाचा: गाजरवाडीची कृषिकन्या गाजवणार युद्धभूमी! बनली तालुक्यातील पहिली महिला फौजी

महापौरांच्या उपस्थितीत हस्तांतरीत

यावेळी महापौर सतिष कुलकर्णी, भाजपा शहराध्यक्ष गिरीष पालवे, आमदार ॲड.राहूल ढिकले, संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, सुनिल केदार, शहर सचिव अमित घुगे, धनंजय माने, चंद्रशेखर पंचाक्षरी, कैलास मोहिेते, आबा कापडणीस, राकेश चव्हाण,शरद बोडके आदी उपस्थित होते.

हेही वाचा: कोविड सेंटरच्या पायरीवर सोडला रुग्णाने प्राण! चांदवडच्या व्हायरल VIDEO मागचं सत्य..