esakal | भाजपचे शहर सरचिटणीस अटकेत..केला 'हा' गुन्हा..
sakal

बोलून बातमी शोधा

sunil adke bjp.jpg

मुंबई नाका पोलिस ठाण्यात 2019 मध्ये संकल्पसिद्धी प्रॉडक्‍ट्‌स नेटवर्क कंपनीने गुंतवणूकदारांना आर्थिक गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष दाखवत फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्याचा तपास नाशिक शहर आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. माउली मल्टिस्टेट, संकल्पसिद्धी, उज्ज्वलम ऍग्रो या कंपनीच्या माध्यमातून फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊन अंबड पोलिसांनी कंपनीचे मुख्य सूत्रधार विष्णू भागवत यांना 7 फेब्रुवारीला अटक केली होती. तसेच आठ एजंटांनाही अटक करण्यात आली होती

भाजपचे शहर सरचिटणीस अटकेत..केला 'हा' गुन्हा..

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : माउली मल्टिस्टेट, संकल्पसिद्धी कंपन्यांच्या माध्यमातून गुंतवणूकदारांच्या कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक फसवणूक प्रकरणात भाजपचे शहर सरचिटणीस आणि नाशिक रोड-देवळाली व्यापारी बॅंकेचे संचालक सुनील खंडेराव आडके (रा. जेल रोड) यांना नाशिक शहर आर्थिक गुन्हे शाखेने सोमवारी (ता. 17) दुपारी अटक केली. संशयित आडके यांनी मुख्य सूत्रधार विष्णू भागवत यांना जमिनीचे बनावट दस्तऐवज तयार करण्यास मदत केल्याचे तपासात समोर आले आहे. दरम्यान, विष्णू भागवत यांची पोलिस कोठडी गुरुवार (ता. 20)पर्यंत वाढविण्यात आली आहे. 

भागवत यांना पुन्हा कोठडी; बनावट दस्तऐवजाद्वारे जमिनीची खरेदी 

मुंबई नाका पोलिस ठाण्यात 2019 मध्ये संकल्पसिद्धी प्रॉडक्‍ट्‌स नेटवर्क कंपनीने गुंतवणूकदारांना आर्थिक गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष दाखवत फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्याचा तपास नाशिक शहर आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. माउली मल्टिस्टेट, संकल्पसिद्धी, उज्ज्वलम ऍग्रो या कंपनीच्या माध्यमातून फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊन अंबड पोलिसांनी कंपनीचे मुख्य सूत्रधार विष्णू भागवत यांना 7 फेब्रुवारीला अटक केली होती. तसेच आठ एजंटांनाही अटक करण्यात आली होती. त्यांची पोलिस कोठडीची मुदत मंगळवारी (ता. 18) संपत आहे. दरम्यान, या प्रकरणी राज्यात आठ, तर हिमाचल प्रदेशातील चंबा आणि केरळमधील कोईमतूर येथेही विष्णू भागवत यांच्याविरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान, मुख्य संशयित भागवत यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी गुन्ह्यांची व्याप्ती आणि बनावट जमिनीप्रकरणी आणखी काही संशयितांना अटक करण्यासाठी भागवतांच्या कोठडीत वाढ करण्याची न्यायालयास विनंती केली. त्यानुसार, न्यायालयाने संशयित भागवत यांना गुरुवारपर्यंत तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. 

हेही वाचा > PHOTOS : "तूच का पेटवून घेते, मीच पेटवून घेतो' असे म्हणून तिच्या हातातील बाटली ओढली...पण...


आडकेंनी तयार केले बनावट दस्तऐवज 
फसवणुकीच्या गुन्ह्यांत तपासामध्ये मुख्य संशयित भागवत यांनी राज्यात ठिकठिकाणी जमिनी खरेदी केल्याचे समोर आले. यातील पालघर येथे कोट्यवधी रुपयांची जमीन खरेदी केल्याचे समोर आले. मात्र जमिनीची कागदपत्रे बनावट असल्याचे सिद्ध झाले. ही बनावट कागदपत्रे सुनील आडके यांनी तयार करून दिल्याचे तपासातून समोर आल्याने आर्थिक गुन्हे शाखेने सोमवारी (ता. 17) दुपारी त्यांना अटक केली. मुख्य संशयित भागवत व आडके यांनी गुंतवणूकदारांच्या पैशांतून मालमत्ता खरेदी केल्याची धूळफेक करीत सुमारे साडेसात ते आठ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे तपासात उघड झाले आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक आयुक्त समीर शेख करीत आहेत. दरम्यान, आडके यांना 2009 मध्ये फसवणूकप्रकरणी अटक करण्यात आलेली आहे. शहर भाजपचे ते सरचिटणीस असून, गेल्या विधानसभा निवडणुकीसाठी ते भाजपचे इच्छुक उमेदवारही होते

हेही वाचा > "माझ्यासोबत गाडीवर चल" असे सांगून तिला घरी घेऊन गेला..अन्..

loading image