esakal | रेमडेसिव्हिर, ऑक्सिनचा पुरवठा सुरळीत व्हावा; भाजपच्या शिष्टमंडळाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

बोलून बातमी शोधा

Nashik
रेमडेसिव्हिर, ऑक्सिनचा पुरवठा सुरळीत व्हावा; भाजपच्या शिष्टमंडळाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : शहराला दररोज पाच हजार रेमडेसिव्हिर इंजेक्शनची आवश्यकता असताना अवघे, पाचशे इंजेक्शन मिळत आहेत. दुसरीकडे बेड व ऑक्सिजनचाही मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. रेमडेसिव्हिरसह ऑक्सिनचा पुरवठा सुरळीत व्हावा, अशी मागणी महापौर सतीश कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे केली.

रुग्णांची संख्या शहरात झपाट्याने वाढत आहे. रुग्ण संख्येचा विचार करता नाशिकची परिस्थिती देशात बिकट आहे. दुसऱ्या लाटेत युवावर्ग बाधित होत आहे. शहराला सध्या दररोज पाच हजार इंजेक्शनची गरज आहे. असे असताना ५०० इंजेक्शनच्या आसपास पुरवठा होत आहे. पुरेशा प्रमाणात इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याने नातेवाइकांना फिरावे लागत आहे. महापौर कार्यालयाकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. शहराला सध्या १०० मेट्रीक टन ऑक्सिजनची गरज आहे, मात्र जवळपास ५० मेट्रीक टन ऑक्सिजन कमी मिळत असल्याने अनेक हॉस्पिटलकडून रुग्णांना दाखल करून घेतले जात नाही. अनेक रुग्णालयांकडून रुग्णांना इतरत्र हलविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ऑक्सिजनअभावी रुग्णाचे काही बरे वाईट झाल्यास जबाबदार राहणार नसल्याचे हमीपत्र भरून घेतले जात आहे. या पार्श्वभूमीवर महापौर सतीश कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी मांढरे यांना निवेदन दिले. खासदार डॉ. भारती पवार, आमदार ॲड. राहुल ढिकले, आमदार सीमा हिरे, शहराध्यक्ष गिरीश पालवे, सभागृहनेते सतीश बापू सोनवणे, गटनेता जगदीश पाटील, प्रशांत जाधव उपस्थित होते.

हेही वाचा: महामारी आजारांचा चारशे वर्षांचा इतिहास! सोशल मीडियावर संदर्भासह चित्र व वृत्त


रेमडेसिव्हिर इंजेक्शन व ऑक्सिजनची मागणी लक्षात घेता पुरवठा कमी होत असल्याची कबुली देताना नियोजन करून रुग्णांना दिलासा देण्याचे आश्‍वासन देण्यात आले. नागरिकांनी बिकट परिस्थिती मध्ये घाबरू नये, भावनेचा उद्रेक न होऊ देता संयमाने घ्यावे.
- सतीश कुलकर्णी, महापौर.

हेही वाचा: डॉक्टर म्हणताहेत..!"नाशिक-नगरची झंझट नको, आम्हाला ऑक्सिजन द्या"