अचूक नियोजन, एकजुटीने भाजपची सत्ता कायम..! 

nashik nmc bjp.jpg
nashik nmc bjp.jpg
Updated on

नाशिक : स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षांकडून कायदेशीर अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्यानंतर भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण होणे साहजिक होते. परंतु स्थायी समितीच्या माजी सभापती हिमगौरी आडके, नीलेश बोरा, गटनेते जगदीश पाटील यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी एकजूट ठेवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे फळ म्हणून भाजपला स्थायी समितीची सत्ता राखण्यात तूर्त यश मिळाले. 

भाजपकडून ताकही फुंकून पिण्याची वेळ

महापालिकेत भाजपची बहुमताने सत्ता असतानाही शिवसेनेने भाजपला स्वस्थ बसू दिले नाही. भाजपमधील सुंदोपसुंदीचा फायदा घेत शिवसेनेने जेरीस आणले. महापौर, उपमहापौर निवडणुकीत ऐनवेळी सूत्रे फिरल्याने पक्षाची बदनामी टाळली. स्थायी समितीत बहुमत असताना विरोधकांकडे सत्ता जाते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. तांत्रिक मुद्यांचा आधार घेत शिवसेनेने भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेच्या डावपेचाने भाजपला सदस्य नियुक्ती झाल्यानंतर तत्काळ सहलीसाठी सदस्य अहमदाबादला रवाना करावे लागले. सुरक्षितस्थळी सदस्य पोचल्यानंतरही महापौर निवडणुकीचा अनुभव लक्षात घेता भाजपकडून ताकही फुंकून पिण्याची वेळ आली. पक्षाला एकसंघ ठेवण्याबरोबरच स्थायीची सत्ता कायम ठेवण्यासाठी पक्षातील युवा नेत्यांची फळी समोर आली. गटनेते जगदीश पाटील यांनी न्यायालयात कायदेशीर लढाई लढली.

सदस्यांमध्ये एकजूट निर्माण करण्यात यश

अहमदाबादमध्ये सदस्यांमध्ये सत्ता स्थापनेचा विश्‍वास निर्माण करण्याची जबाबदारी स्थायी समितीच्या माजी सभापती हिमगौरी आडके व नीलेश बोरा यांनी पार पाडली. कायदेशीर लढाई लढण्याबरोबरच सदस्यांमध्ये एकजूट निर्माण करण्यात यश आले. त्याचा परिणाम स्थायी समितीच सत्ता कायम ठेवण्यात यश आले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com