esakal | VIDEO : वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराचा निषेध; भाजपातर्फे वीज बिलाची होळीच
sakal

बोलून बातमी शोधा

bjp.jpg

सिटी सेंटर मॉल येथे समारोपाच्या वेळेस वीज बिलाची होळी करून आंदोलन करण्यात आले. या सरकारचा करायचं काय, खाली डोकं वर पाय...उद्धव सरकार हाय हाय...वीज बिल माफ करा, माफ करा अशा घोषणांनी निषेध व्यक्त करण्यात आला.

VIDEO : वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराचा निषेध; भाजपातर्फे वीज बिलाची होळीच

sakal_logo
By
प्रमोद दंडगव्हाळ

नाशिक : (सिडको) भाजपातर्फे वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराचा निषेध करण्यासाठी वीज बिल दुरुस्तीसाठी सोमवारी (ता. 3) निषेध पदयात्रा काढण्यात आली. पवननगर, त्रिमूर्ती चौक ते सिटी सेंटर मॉल अशी पदयात्रा काढून वाढीव वीजबिलासंदर्भात आंदोलन करण्यात आले. 

वीज बिलाची होळी करत आंदोलन... 

जनतेच्या सहभागाने वीज वितरण कंपनी व महाराष्ट्र शासनाच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. सिटी सेंटर मॉल येथे समारोपाच्या वेळेस वीज बिलाची होळी करून आंदोलन करण्यात आले. या सरकारचा करायचं काय, खाली डोकं वर पाय...उद्धव सरकार हाय हाय...वीज बिल माफ करा, माफ करा अशा घोषणांनी निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी महापौर सतीश कुलकर्णी म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जे अवाच्या सव्वा वीजबिल आकारणी केली आहे, ते माफ करावे. लवकरात लवकर याबाबतीत निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन केले जाईल. 

हेही वाचा > अमानुष! रक्ताच्या थारोळ्यात घरात पडलेली पत्नी..बाहेरून दरवाजा लावून निर्दयी पती फरार ..थरारक घटना

यावेळी शहराध्यक्ष गिरीश पालवे, मंडळ अध्यक्ष अविनाश पाटील, सभागृहनेते सतीश सोनवणे, गटनेते जगदीश पाटील, नगरसेविका छायाताई देवांग, प्रतिभा पवार, सचिन कुलकर्णी, अमोल पाटील, बडवे गुरुजी आदी कार्यकर्ते, पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते.

हेही वाचा > सहा फुटांच्या खड्ड्यातून आली दुर्गंधी.. गावकऱ्यांना भलताच संशय....शोध घेताच गावात एकच खळबळ

संपादन - किशोरी वाघ

loading image