उड्डाणपूलावरून राजकारण; भाजप करणार प्रकरणाचा पर्दाफाश

bjp and shivsena
bjp and shivsenaesakal

नाशिक : महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर (nashik muncipal corporation) सर्वपक्षीय नगरसेवकांना विकासकामांसाठी निधीची आवशक्यता असल्याने शहरातील दोन्ही उड्डाणपूल तातडीने रद्द करण्याबरोबरच पुलांसाठी शिवसेनेच्या (shivsena) एका बड्या नेत्याने रिंग केल्याचा आरोप भाजपच्या नगरसेवकांनी करत येत्या काही दिवसांत कागदपत्रांसह या प्रकरणाचा पर्दाफाश करण्याचा दावा केला आहे. (bjp-shivsena-politics-on-flyover-nashik-marathi-news)

ठेकेदारांची रिंग करणारा शिवसेनेचा नेता कोण?

पुढील सहा महिन्यांमध्ये महापालिकेच्या निवडणुका होणार असून, दीड वर्षात कोरोनाची परिस्थिती बघता शहराचा समतोल विकास करण्यामध्ये, तसेच मूलभूत सुविधा पुरवण्यामध्ये अनेक बंधने आली आहेत. सर्वपक्षीय नगरसेवकांना आपल्या प्रभागांमध्ये जास्तीत जास्त मूलभूत कामे करण्याची गरज वाटत असून, त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. हा प्रश्‍न एकट्या भाजपचा नसून सर्वपक्षीय नगरसेवकांकडून निधीची मागणी केली जात आहे. मध्यंतरी कोरोना उपाययोजनांसाठी जास्तीत जास्त निधीदेखील सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाठपुरावा केल्यामुळे दिला गेला. आता संपूर्ण शहराचा समतोल विकास होईल, अशा पद्धतीने नियोजन करून प्रभाग विकास निधीमध्ये वाढ करणे आवश्यक आहे, असे निवेदनात म्हटले आहे. सभागृहनेते कमलेश बोडके, शहराध्यक्ष गिरीश पालवे, स्थायी समिती सभापती गणेश गिते, गटनेते अरुण पवार, मुकेश शहाणे, इंदूबाई नागरे, पूनम सोनवणे, पूनम धनगर, माधुरी बोलकर, छाया देवांग आदींनी निवेदन दिले.

उड्डाणपूल आग्रहाचा हेतू शुद्ध नाही

शहरात २५० कोटींचे दोन उड्डाणपूल प्रस्तावित आहेत. पूल होणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र, या उड्डाणपुलासाठी आग्रह धरण्याचा हेतू शुद्ध नसल्यामुळे किंबहुना त्यात आर्थिक हित आहे. पूल तत्काळ रद्द करणे गरजेचे आहे. याप्रकरणी नेमके गौडबंगाल काय आहे, हे शोधण्याचा प्रयत्न आहे. ही संपूर्ण प्रक्रिया शिवसेनेच्या एका बड्या नेत्याने रिंग करून हाताळल्याचा संशय असून, त्यास पुष्टी देणारी काही कागदपत्रे हातात लागली आहेत. ज्यात सकृतदर्शनी ठेकेदार आणि शिवसेनेच्या संबंधित पदाधिकाऱ्यांचे हितसंबंध दिसत आहेत. पुढील दोन दिवसांमध्ये या संदर्भातील सर्व कागदपत्रे, तसेच पुरावे पडताळून आपल्याकडे सादर केले जातील. त्यात तथ्य असेल तर तत्काळ दोन्ही उड्डाणपुलांची कामे रद्द करावी, अशी मागणी केली आहे. तसेच यात गुंतलेल्यांवर कारवाईसाठी भाजप आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला.

bjp and shivsena
नाशिकमध्ये बससेवेला प्रवाशांचा अल्‍प प्रतिसाद
bjp and shivsena
अनलॉकमुळे नाशिकच्या औद्योगिक जगतात आनंदाचे वातावरण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com