protest
protestesakal

नाशिक : भुजबळांच्या वाटेत निषेधाच्या रांगोळ्या

सिडको (नाशिक) : विद्यार्थ्यांच्या आयुष्याची राखरांगोळी करणारे विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयक (New University Bill) महविकास आघाडी सरकारने (Mahavikas aghadi government) मुद्दाम घाई- घाईने पारित करून घेतले. या माध्यमातून प्र. कुलपती हे नवीन पद तयार करून सन्मा. कुलपतींचे अधिकार उच्च तंत्र शिक्षण मंत्री यांना दिले जाणार आहेत. विद्यापीठांना राजकारणाचा अड्डा बनविण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे.

भविष्यात कुलगुरूंच्या नियुक्त्या, विद्यार्थ्यांच्या पदव्या या सगळ्यातच आरोग्य सेवक भरती परीक्षा, म्हाडा परिक्षा प्रमाणे करोडोंच्या भ्रष्टाचाराचे विषय करण्यासाठी सरकारला हे प्र.कुलपती पद पाहिजे का? हा प्रश्न विद्यार्थी विचारत आहे.

protest
लॉकडाऊनला निमंत्रण देतेय पर्यटनस्थळांवरील गर्दी ; पर्यटकांना पडला मास्क चा विसर

या विधेयकाला विरोध करण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाने मुख्यमंत्र्यांना १० लाख पत्र पाठवले. त्यानंतर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांना मिस कॅाल्स (miss call), मेसेज (massage), ई-मेल (e-mail) पाठवून निषेध व्यक्त केला.

राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल घ्यावी या साठी आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणुन भारतीय जनता युवा मोर्चा युवती विभाग नाशिक महानगरच्यावतीने नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या भुजबळ फार्म निवासस्थानाबाहेर पहाटे ६.०० वाजता निषेधाची रांगोळी काढण्यात आली.

protest
पहिल्यांदा Persoanl Loan घेताय! लक्षात ठेवा पाच गोष्टी

यावेळी भाजयुमो शहर सरचिटणीस ऋषिकेश आहेर, शहर युवती प्रमुख साक्षी दिंडोरकर, स्वाती माळोदे, मयुरी शुक्ल, लीना मोरे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com