लॉकडाऊनला निमंत्रण देतेय पर्यटनस्थळांवरील गर्दी ; पर्यटकांना पडला मास्क चा विसर

प्रशासकीय यंत्रणेचे गर्दीवर कुठलेही नियंत्रण बघायला मिळाले नाही
nashik tourism
nashik tourismSAKAL
Summary

प्रशासकीय यंत्रणेचे गर्दीवर कुठलेही नियंत्रण बघायला मिळाले नाही

नाशिक : कोरोनाचा वाढता(corona update nashik ) प्रादूर्भाव पाहता खुल्‍या पर्यटनस्‍थळांवर पर्यटकांना बंदी घालण्याचा निर्णय जाहीर (tourism is closed)केला होता. प्रत्‍यक्षात पर्यटनस्‍थळांवर पर्यटकांची मोठी गर्दी रविवारी (ता. १६) बघायला मिळाली. प्रशासकीय यंत्रणेचे कुठलेही नियंत्रण बघायला मिळाले नाही, तर अनेक पर्यटकांना मास्‍कचा विसर पडल्‍याचे बघायला मिळाले.

nashik tourism
India’s Best Dancer 2 winner: पुण्याच्या सौम्या कांबळेनं जिंकला 'इंडियाज बेस्ट डान्सर'चा किताब

रविवारी पंचवटीतील तपोवन, रामकुंड व परिसरात पर्यटकांची वर्दळ बघायला मिळाली. अनेक पर्यटक परजिल्‍हा, परराज्‍यातून आले होते. कोरोना महामारीचा प्रादूर्भाव वाढत असताना, पर्यटनस्‍थळांवर पर्यटक बंदीच्‍या निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्‍याचे चित्र या वेळी बघायला मिळाले. सायंकाळी उशीरापर्यंत पर्यटनस्‍थळांवर पर्यटकांचा वावर कायम होता.

धोकादायक बाब म्‍हणजे अनेक पर्यटकांना मास्‍कचा विसर पडलेला होता, तर काहींनी योग्‍य पद्धतीने मास्‍क परिधान केलेला नसल्‍याचेही बघायला मिळाले. यामुळे कोरोनाचा फैलाव होण्याची भिती निर्माण झाली आहे. अशात खुल्‍या पर्यटनस्‍थळांवर पर्यटकांच्‍या बंदीचा निर्णय केवळ कागदावर राहिल्‍याची स्‍थिती सध्या बघायला मिळत आहे.

nashik tourism
‘अ’ लघुपट, ‘मॅन इन मँचेस्टरला उत्कृष्ट डॉक्युमेंट्रीचा 'किताब

नाशिककरांमध्ये आउटींग फिव्‍हर

सुट्टीची संधी साधत नाशिककरांकडूनही(nashik tourism ) आउंटींगवर भर दिला जात असतो. सध्या निर्बंध लागू असले, तरी नाशिककरांमध्ये आउटींगचा फिव्‍हर बघायला मिळाला. यातून गंगापूर रोडवरील सोमेश्‍वर धबधबा, बालाजी मंदिर, सोमेश्‍वर मंदिर यांसह अन्‍य पर्यटनस्‍थळांवर गर्दी बघायला मिळत होते. या गर्दीवर नियंत्रण(control of crowd) ठेवण्यासाठी प्रशासनाने(nashik administration) ठोस उपाययोजना करण्याची आवश्‍यकता या वेळी व्‍यक्‍त केली जात होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com