मनसे, शिवसेनेला भाजपचा धक्का; दोन माजी नगरसेवक भाजपात

दोन माजी नगरसेवक भाजपात
दोन माजी नगरसेवक भाजपातदोन माजी नगरसेवक भाजपात

नाशिकरोड : मनसेचे माजी नगरसेवक सध्या शिवसेनेते कार्यरत असलेल व्यापारी सहकारी बँकेचे संचालक अशोक सातभाई आणि माजी नगरसेवक भय्या मनियार यांनी रविवारी भारतीय जनता पार्टीत कार्यकर्ता मेळाव्यात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. याप्रसंगी आमदार राहुल ढिकले, भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, नाशिकरोड मंडळ अध्यक्ष हेमंत गायकवाड आदी उपस्थित होते.

रशिया-युक्रेन युद्धावर रामदास आठवले यांची कविता; ‘...म्हणून परेशान आहे युक्रेन’

असे असतानाच भाजपने नाशिकरोड येथील दोन माजी नगरसेवक भाजपकडे आणले. नाशिकरोड भागात प्रभाग रचनेत मोठा बदल केला आहे. अनेक विद्यमान नगरसेवकांना त्याच पक्षात राहून उमेदवारी मिळते की नाही याची शाश्वती नसल्याने पक्ष बदले जात असल्याचे नागरिकांमध्ये चर्चा होती. सन २०१२ ते २०१७ या काळात अशोक सातभाई हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून नगरसेवक झाले होते. सभागृह नेते पदावर त्यांनी काम केले. त्यानंतर मनसेची सत्ता जाताच २०१७ मध्ये ते स्वगृही म्हणजे सेनेत आले. सेनेकडून लढल्यानंतर त्याना पराभव पत्करावा लागला. आता पुन्हा भाजपकडून ते यंदा महापालिकेत जाण्याचे तयारीत आहे.

भय्या मनियार हे शिवसेनेकडून महापालिकेत गेले होते. स्थायी समितीचे सदस्य हे लाभाचे पद त्यांना मिळालेल होते. उत्तर महाराष्ट्रात एकमेव शिवसेना नगरसेवक म्हणून त्याची नावलौकिक होते. निवडणुकीत त्यांना पक्षाने उमेदवारी न दिल्याने नाराजी व्यक्त केली होती. निवडणूक संपताच त्यांनी मनसेत प्रवेश केला. काही काळ तटस्थ राहिल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com