bogus voters list
sakal
नाशिक: शहरातील तीन आणि देवळाली अशा चार विधानसभा मतदारसंघांत तीन लाख ५३ हजार ९४९ दुबार व बोगस मतदार आहेत, असा दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केला आहे. पक्षातर्फे सोमवारी (ता. १३) यासंदर्भात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदनासह पुरावा म्हणून बोगस व दुबार मतदारांची छापील माहिती तसेच पेनड्राइव्ह देण्यात आला. ही नावे यादीतून वगळून मतदान केंद्रांवर अचूक चिन्हांकित यादी उपलब्ध करून देण्याची मागणी पक्षाने केली.