उडान योजनेमुळे विकासाला बुस्टर डोस; नाशवंत मालाला अवकाश मोकळे

PM krushi udaan yojana latest marathi news
PM krushi udaan yojana latest marathi newsesakal

नाशिक : सर्वसामान्यांना विमान प्रवास (Aeroplane travel) सोपा करण्याबरोबरचं विकसनशील शहरांना मेट्रो शहरांशी जोडण्यासाठी राबविण्यात आलेल्या उडान योजनेनंतर (Udaan Scheme) आता शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला देशाची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी सुरु होणाऱ्या कृषी उडान योजनेतून उत्तर महाराष्ट्राच्या विकासाला बूस्टर डोस मिळणार असून कृषी माल निर्यातीत दहा पट वाढ होणार आहे.

नाशिकच्या फुले व द्राक्षांना तत्काळ बाजारपेठ उपलब्ध होईल तर जळगावची केळी, नगरचे दूध व दुग्धजन्य पदार्थ वेगाने देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचणार आहे. या निमित्ताने नाशिककरांकडून हवाई सेवेसाठी उपलब्ध पायाभूत सुविधांचा वापर करण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेला पाठबळ मिळणार आहे.

मात्र उत्पादित कृषी मालाची वाहतुकीचे दर नियंत्रणात असणे देखील गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. (Booster dose to development due to Udan Yojana good opportunity perishable goods Latest marathi news)

साठवणीतील शेतमाल खराब झाल्यास आर्थिक नुकसान होत असल्याने केंद्र सरकारने कृषी उडान योजना आणली आहे. त्यात देशातील ५२ विमानतळांचा समावेश करण्यात आला असून महाराष्ट्रातील नाशिक व नागपूर विमानतळाचा समावेश करण्यात आला आहे.

केंद्राच्या योजनेमुळे उत्तर महाराष्ट्राला व विशेष करून नाशिकच्या पदरी दोन महत्त्वाचे लाभ पडणार आहे. अनेक वर्षांपासून पूर्ण क्षमतेने वापरात येत नसलेले कार्गो विमानतळाचा वापर सुरु होऊन उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधांकडे लक्ष जाणार आहे.

नाशिकमधून फुले, कांदा याबरोबरचं शक्य झाल्यास कांद्याची देखील वाहतूक होणार आहे. नगर जिल्ह्यातील दूध व दुग्धजन्य पदार्थ, जळगावची केळी या निमित्ताने देशाच्या बाजारपेठांमध्ये वेगाने पोहचेल. मध्यंतरीच्या काळात नाशिकच्या कार्गो विमानतळावरून प्रवासी विमानातून फुले दिल्लीत पाठविली जात होती.

हॅलकॉनच्या माध्यमातून शेळी-मेंढ्या दुबईत पाठविण्यात आल्या. परंतु सेवेत सातत्य नसल्याने सेवा बंद झाली. सध्या मुंबई मार्गे देशभरात फुले पाठविली जात आहे. वाइन बरोबरच हॉर्टीकल्चर कॅपिटल म्हणून नाशिकचे स्थान आहे. दिल्ली तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नाशिकच्या फुलांना मागणी आहे.

वर्षभरात जवळपास शंभर कोटी रुपयांची उलाढाल होते. कृषी उडान योजनेंच्या माध्यमातून कृषी मालाला जलदगतीने देशांतर्गत बाजारपेठ मिळणार असल्याने उत्पादनात दहा पटीने वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

PM krushi udaan yojana latest marathi news
जिल्ह्यात पावसाची द्विशतकी अन दिंडोरीत त्रिशतकी ‘बॅटींग'

"सध्या फुले, द्राक्षासह अन्य कृषी माल हॅलकॉन मार्गे मुंबईला जातो. परंतु कृषी उडान योजनेच्या माध्यमातून नाशिकमधून माल पाठविण्याची सोय उपलब्ध होईल. त्यामुळे उत्पादन वाढेल. विशेष करून हॉर्टीकल्चरला अधिक चालना मिळेल. ओझर येथून नाशिककरांचा नागरी व कार्गो विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरु करण्याच्या मोहिमेला या निमित्ताने पाठबळ मिळतं आहे."

- मनीष रावल, चेअरमन, एव्हिएशन कमिटी, आयमा.

"फुलांच्या वाहतुकीसाठी योजना फायदेशीर ठरेल. औषधे, स्ट्रॉबेरी वाहतूक देखील शक्य होईल. द्राक्ष तसेच अन्य पिकांबाबत कृषी उडानचे दर कसे राहतील त्यावर फायदा की तोटा अवलंबून राहील. काही प्रमाणात का होईना कृषी उडान योजनेचा फायदा मात्र आहे."

- विलास शिंदे, संस्थापक अध्यक्ष, सह्याद्री ॲग्रो फार्मस.

PM krushi udaan yojana latest marathi news
जिल्ह्यात कांद्याच्या भावातील घसरण थांबण्याचे घेईना नाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com