
जिल्ह्यात कांद्याच्या भावातील घसरण थांबण्याचे घेईना नाव
नाशिक : उन्हाळ कांदा विक्रीचा (Onion Selling) हंगाम सुरु असताना पाऊस (Rain) कोसळतोय. रस्त्यांची दुरवस्था झाल्याने निर्यातीप्रमाणे देशांतर्गत पाठवण्यात येणाऱ्या कांद्याच्या वाहतुकीचा वेग मंदावला आहे. अशा एका विचित्र परिस्थितीत कांद्याच्या भावातील घसरण थांबण्याचे नाव काही केल्या घेतले जाईना.
त्यामुळे स्वाभाविकपणे शेतकऱ्यांच्या आता दक्षिणेतील पावसामुळे तेथील कांद्याच्या उत्पादनाची स्थिती काय राहील, याकडे खिळल्या आहेत. (onion price decreased by Rs 50 per quintal nashik onion rate latest news)
हेही वाचा: आदिमायेच्या जयघोषात श्री सप्तशृंगीच्या मूर्ती संवर्धन कार्यास प्रारंभ
कांद्याचे आगार असलेल्या नाशिक जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये एका दिवसांमध्ये क्विंटलला सरासरी ५० रुपयांनी भावात घसरण झाली आहे. अगोदर सोमवारी (ता. १८) शेतकऱ्यांना पूर्वीच्या भावाच्या तुलनेत क्विंटलला ५० ते १०० रुपये कमी भावावर समाधान मानावे लागले होते.
मुंबईमध्ये क्विंटलला १ हजार ३५० रुपये असा सरासरी भाव कायम राहिला आहे. जिल्ह्यात मात्र भावाची स्थिरता राहणे मुश्कील झाले आहे.
बाजारपेठनिहाय आज क्विंटलला मिळालेला सरासरी भाव रुपयांमध्ये पुढीलप्रमाणे असून (कंसात सोमवारी क्विंटलला मिळालेला सरासरी भाव रुपयांमध्ये दर्शवतो) : लासलगाव-१ हजार १५० (१ हजार २२५), मुंगसे-१ हजार १५० (१ हजार २०१), चांदवड-१ हजार २५ (१ हजार ५०), मनमाड-१ हजार १०० (१ हजार ५०), पिंपळगाव बसवंत-१ हजार ३०० (१ हजार ३५०), देवळा-१ हजार १५० (१ हजार २५०), नामपूर-१ हजार २०० (१ हजार २००), नाशिक-१ हजार (१ हजार ५०), सटाणा-१ हजार २२५ (१ हजार २६५).
हेही वाचा: जिल्ह्यात पावसाची द्विशतकी अन दिंडोरीत त्रिशतकी ‘बॅटींग'
Web Title: Onion Price Decreased By Rs 50 Per Quintal Nashik Onion Rate Latest News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..