esakal | मंडप व्यावसायिक म्हणताएत, "अशी परिस्थिती यापूर्वी कधीच पाहिली नाही"
sakal

बोलून बातमी शोधा

mandap.jpg

कोरोनामुळे यंदा गणेशोत्सव मंडळांमध्ये उदासीनता दिसत असून, ८० ते ९० टक्के मंडळांनी उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मंडप, रोषणाई आणि ध्वनिक्षेपकाचा व्यवसाय करणाऱ्यांवर परिणाम झाला आहे. शहरातील व्यावसायिकांचे सुमारे २० ते २५ कोटींचे नुकसान झाल्याची माहिती व्यावसायिकांनी दिली. 

मंडप व्यावसायिक म्हणताएत, "अशी परिस्थिती यापूर्वी कधीच पाहिली नाही"

sakal_logo
By
युनूस शेख

नाशिक ः कोरोनामुळे यंदा गणेशोत्सव मंडळांमध्ये उदासीनता दिसत असून, ८० ते ९० टक्के मंडळांनी उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मंडप, रोषणाई आणि ध्वनिक्षेपकाचा व्यवसाय करणाऱ्यांवर परिणाम झाला आहे. शहरातील व्यावसायिकांचे सुमारे २० ते २५ कोटींचे नुकसान झाल्याची माहिती व्यावसायिकांनी दिली. 

का आहेत मंडप व्यावसायिक हताश, वाचा...

कोरोनामुळे शहर-जिल्ह्यात गणेशोत्सवही साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय अनेक मंडळांनी घेतला आहे. सुमारे ९० टक्के मंडळांनी गणेशोत्सव साजरा करण्यापासून माघार घेतल्याने मंडळांची संख्या घटली आहे. यात मुख्य मंडळांचा समावेश आहे. मंडप, रोषणाई, ध्वनिक्षेपणाचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यावसायिकाकडे १५ ते २० मंडळांची कामे असतात. त्यातून त्यांना लाखोंचे उत्पन्न मिळते. यंदा मागणी नसल्याने तिन्ही व्यवसाय ठप्प आहेत.

अशी परिस्थिती यापूर्वी कधीच पाहिली नाही,

बहुतांशी व्यावसायिकांकडे एकाही मंडळाची ऑर्डर नाही. दर वर्षी याच व्यावसायिकांना स्वतःच्या घरातील गणेशोत्सव साजरा करण्यास वेळ मिळत नव्हता. उत्सवाचे दहा दिवस त्यांच्यासाठी सुगीचे असत. या वर्षी कोरोनाने त्यावर पाणी फिरविले आहे. काही व्यावसायिकांना एखाद्या मंदिराचे काम आहे. काहींना एकही काम नाही. लग्नसराईत झालेले नुकसान गणेशोत्सवात भरून निघेल, असे वाटत होते; परंतु तीही आशा आता धुळीस मिळाली. 

हेही वाचा > दुर्दैवी! बैलपोळ्याच्या पूर्वसंध्येला अचानक आलेल्या 'त्या' बातमीने ममदापूर हळहळले..काय घडले नेमके?

शेवटच्या दिवसापर्यंत फोनवरच नजरा 
मंडप व्यावसायिक यंदा मागणी नसल्याने रिकामे बसून आहेत. त्यांच्या नजरा मोबाईलवर लागून आहेत. मोबाईल वाजेल अन् एखादी ऑर्डर मिळेल, या आशेवर व्यावसायिक बसले आहेत. आजपर्यंत कधीही अशी परिस्थिती आली नसल्याचे त्यांनी सांगितले. 

 
दर वर्षी माझ्याकडे १४ मुख्य मंडळांची कामे असत. या वर्षी केवळ एका मंडळाचे काम आहे. तेही केवळ मंदिरासमोर छोटा मंडप टाकण्याचे. स्वतःचा विचार केला तर सुमारे १५ ते २० लाखांचे नुकसान झाले. 
-चंदर वाघेरे, मंडप व्यावसायिक 

गणेशोत्सवात कामाचा इतका ताण असायचा, की घरातील गणेशस्थापनेसाठीच्या सजावटीस वेळ मिळत नसे. सध्या काम नसल्याने घरातील सजावटीचे काम करण्याची वेळ आली आहे. आजपर्यंत अशी परिस्थिती आलेली नाही. -जगदीश बेलदार, ध्वनिक्षेपण आणि मंडप व्यावसायिक 

हेही वाचा > धाबे दणाणले! नियुक्ती होऊनही उमेदवार कामावर नाही?कारवाई तर होणारच

संपादन - मनीष कुलकर्णी

loading image
go to top