BSNL 4G
BSNL 4G esakal

Nashik BSNL 4G : नॉट रिचेबल 69 दुर्गम गावात ‘बीएसएनएल’ची 4 जी टॉवर

Nashik BSNL 4G : फाईव्ह जीच्या जमान्यात अद्यापही जिल्ह्यातील ग्रामीण आणि दुर्गम आदिवासी भागात मोबाईलला रेंज नसते. (BSNL 4G tower will be set up in 69 not reachable remote villages Nashik news)

त्यामुळे विद्यार्थ्यांनाही ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहावे लागत असल्याने अशा कायम नॉट रिचेबल गावात सरकारी कर्मचारी, अधिकारी फिरकत नाहीत, त्यामुळे ‘बीएसएनएल’च्या माध्यमातून अशा गावांमध्ये ‘फोर जी टॉवर’ उभारले जाणार आहेत.

जिल्ह्यातील ६९ गावांचा यास समावेश आहे. जिल्हा प्रशासनाने त्यांना जागाही बहाल केली असल्याने ही ‘नॉट रिचेबल’ असलेली ६९ गावे आता भ्रमणध्वीनद्वारे सहजच संपर्कात येणार असल्याचा मार्ग मोकळा होईल.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

BSNL 4G
Nashik Onion Rate Hike : आगरात कांद्याचा भाव 2200 ते 2400 रुपये; एका दिवसात वृद्धी

डिजिटल इंडिया योजनेंतर्गत ‘बीएसएनएल’द्वारे टॉवर उभारला जाणार आहे. त्यासाठी त्यांनी ६९ गावांमध्ये टॉवर देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर केला होता. यापैकी महसूल विभागाने २६ ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली.

जिल्हा परिषद नाशिकने ४३ ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली असून, एकूण ६९ ठिकाणी टॉवर उभारले जातील, असे जिल्हा प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

४३ गावठाणांतील ठिकाणं अशी

सुरगाणा (१२), त्र्यंबकेश्वर (९), बागलाण (४), पेठ (१२), कळवण (४), इगतपुरी (१), नांदगाव (१).

BSNL 4G
Nashik News : जागृत देवस्थान असलेल्या येवल्यातील शिवमंदिरात नागाचे दर्शन; श्रावणातील दर्शनामुळे कुतुहल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com