
Nashik News : बौद्ध धम्म पदयात्रेचे नांदूर नाका येथे जोरदार स्वागत
पंचवटी : भगवान बुद्ध यांच्या अस्थी धातू कलश घेऊन परभणी येथून निघालेली बौद्ध धम्म पदयात्रा मुंबई येथील चैत्यभूमीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. या यात्रेचे सोमवार (ता.६) शहरातील नांदूर नाका येथे जोरदार स्वागत करण्यात आले.
थायलंड येथील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ११० बौद्ध भिक्खू यांचाही या पदयात्रेत समावेश आहे. शहरातील विविध ठिकाणी या पदयात्रेचे स्वागत केले जात असून, पांडवलेणी येथे या पदयात्रेचा मुक्काम होणार आहे.
औरंगाबाद रोडवरील माडसांगवी येथून मंगळवारी सकाळी ही पदयात्रा नाशिक शहराच्या दिशेने निघाली. नांदूर नाका येथे ही पदयात्रा साडे अकरा वाजेच्या सुमारास पोहचली. याठिकाणी फुलांचा वर्षाव करीत व ढोलताशांच्या गजरात या बौद्ध धम्म पदयात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले. (Buddhist Dhamma Padayatra received a warm welcome at Nandur Naka Nashik News)

फुलांचा वर्षाव करीत व ढोलताशांच्या गजरात या बौद्ध धम्म पदयात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले.
पदयात्रेच्या मार्गावर महिला वर्गाकडून रांगोळी काढण्यात आली होती. याठिकाणी छोटेखानी उभारण्यात आलेल्या स्टेजवर भगवान गौतम बुद्धांची मूर्ती ठेवण्यात आली होती. या पदयात्रेत सहभागी असलेल्या बौद्ध भिक्खुंनी या मूर्तीस पुष्प अर्पण करण्यात आले. यानंतर ही पदयात्रा कैलास नगर मार्गे टाकळीच्या दिशेने मार्गक्रमण सुरू होते.
दरम्यान, या मार्गावर ठिकठिकाणी फलाहार, पाणी, सरबत आदींचे वाटप करण्यात येत होते. यासह फुलांचा वर्षाव करून स्वागत देखील केले जात होते. तर सायंकाळी उशिरा ही पदयात्रा पांडवलेणीच्या पायथ्याशी असलेल्या बौद्ध स्मारकात मुक्काम करून पुढे मुंबईच्या दिशेने वाटचाल सुरू करणार आहे.
हेही वाचा: ढोलेरा- ग्रीनफिल्ड सिटी आणि महाप्रचंड औद्योगिक हब...
परभणी येथे (ता.१७) जानेवारी रोजी निघालेल्या या बौद्ध धम्म पदयात्रेत आंतरराष्ट्रीय बौद्ध भिक्खु संघ थायलंड येथील ११० भंते यांचा सहभाग आहे. या पदयात्रेत भगवान बुद्ध यांच्या अस्थी धातू कलश असून, भाविक, नागरिक यांच्यासह समाज बांधव या कलशाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
मिरची हॉटेल येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन तर्फे रवी पगारे गणेश गायकवाड तसेच गावरान तडका हॉटेल येथे संतोष अण्णा बहेरा आकाश नाना साळवे हनि शर्मा लखन पगारे यानंतर टाकळी गावामध्ये धम्मदेशना कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजक राहुल भाऊ दिवे होते तसेच वडाळा वस्ती येथे डी आर सी एक उम्मीद व समता बहुउद्देशीय सेवाभावी संस्था तर्फे रॅलीचे स्वागत व खिरादान कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजक शाहीर ताराचंद मोतमल स्वराज नंद ,दिलीप लिंगायत सावित्रीबाई फुले वस्ती येथील स्वागत केले भीमसैनिकांनी केले तसेच ड्रीम सिटी चौकात माजी नगरसेविका मेघाताई नितीन साळवे हेमंत पापाळे गौरव शिंपी रवी तांदळे विशाल साळवे यांनी धम्म रॅलीचे स्वागत केले या रॅलीमध्ये त्यांनी भिक्खू संघांना पाणी बॉटलचे वाटप केले धम्म रॅलीचे चे पुष्पहार उधळून स्वागत केले.
"पदयात्रेस परभणी येथून प्रारंभ झाला आहे. तथागत बुद्धांच्या अस्ती धातू कलश चैत्यभूमीकडे घेऊन जात आहोत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या धम्म धर्मियांनी तसेच इतर धर्मियांनी दर्शनाचा लाभ घ्यावा. थायलंड येथील ११० भंते यांचा सहभाग आहे. पदयात्रेच्या माध्यमातून शांतता, समतेचा संदेश देत जनजागृती व्हावी हा उद्देश आहे."
डॉ.सिद्धार्थ हत्त्तीअंभीरे (निमंत्रक तथा आयोजक)