मालेगाव भीषण वास्तव! "रोज उठ रहे जनाजोंसे सबक न सिका तो.."सहा दिवसांत चक्क 'इतके' मातीत दफन 

malegaon kabra 1.png
malegaon kabra 1.png

नाशिक / मालेगाव : "मौत का सिलसिला थमने का नाम नहीं ले रहा' अशी स्थिती मालेगाव शहरात आहे. मालेगाव मध्यमधील बडा व आयेशानगर कब्रस्तानात गेल्या महिन्यात सहाशेहून अधिक जणांचा दफनविधी पार पडला. त्यात कुठलाही फरक पडलेला नाही. एरवी सामान्य स्थितीत बडा कब्रस्तानात रोज आठ, तर आयेशानगर कब्रस्तानात दोन दफनविधी होतात. त्यात लक्षणीय वाढ झाली आहे. रमजान महिन्याच्या पवित्र काळात होणारे मृत्यू संबंधितांच्या कुटुंबीयांना चटका लावून जाणारे ठरत आहेत.

"रोज उठ रहे जनाजोंसे सबक न सिका तो मुश्‍किल घडी आन पडी

राज्यात हॉटस्पॉट असलेल्या मालेगावी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 448 झाली आहे. 18 रुग्णांचा कोरोनाने, तर 50 संशयितांचा मृत्यू झाला आहे. अशातच येथील रुग्णालय सुरू झाल्यानंतरही शहरात 1 ते 6 मे या सहा दिवसांत सव्वादोनशे जणांनी मृत्यूला कवटाळले आहे. शहरातील प्रत्येक विभागात एकतरी जनाजा नजरेस पडत आहे. "रोज उठ रहे जनाजोंसे सबक न सिका तो मुश्‍किल घडी आन पडी' अशी भीती आता शहरात व्यक्त होऊ लागली आहे. दरम्यान, राज्य शासनाने आता या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली असून, कब्रस्तानातील दफनविधीच्या नोंदींची माहिती मागविली आहे. 

"मौत का सिलसिला थमने का नाम नहीं ले रहा'

एप्रिलमध्ये शहरातील मृत्यूचे सरासरी प्रमाण तिपटीने वाढले होते. हा सिलसिला मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही कायम आहे. विशेष म्हणजे एप्रिलमध्ये शहरातील पूर्व-पश्‍चिम भागातील बहुसंख्य हॉस्पिटल, दवाखाने बंद होते. यामुळे नॉन कोविड रुग्णांचा उपचाराअभावी मृत्यू झाला, असे म्हणण्यास संधी होती. रुग्णालयाबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी झाल्या. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तंबी दिल्यानंतर येथील 70 टक्के खासगी हॉस्पिटल सुरू झाले आहेत. तरीदेखील "मौत का सिलसिला थमने का नाम नहीं ले रहा' अशी स्थिती मालेगाव शहरात आहे. मालेगाव मध्यमधील बडा व आयेशानगर कब्रस्तानात गेल्या महिन्यात सहाशेहून अधिक जणांचा दफनविधी पार पडला. त्यात कुठलाही फरक पडलेला नाही. एरवी सामान्य स्थितीत बडा कब्रस्तानात रोज आठ, तर आयेशानगर कब्रस्तानात दोन दफनविधी होतात. त्यात लक्षणीय वाढ झाली आहे. रमजान महिन्याच्या पवित्र काळात होणारे मृत्यू संबंधितांच्या कुटुंबीयांना चटका लावून जाणारे ठरत आहेत. 

बडा कब्रस्तानात 1 ते 6 मेदरम्यान झालेल्या दफनविधीची आकडेवारी 
1 मे ः 26 
2 मे ः 37 
3 मे ः 26 
4 मे ः 28 
5 मे ः 34 
6 मे ः 26 
एकूण ः 177 

हेही वाचा >मालेगावात शासकीय रुग्णालयातच छापा..धक्कादायक माहिती उघड.. वैद्यकीय क्षेत्रात खळबळ!

आयेशानगर कब्रस्तान 
1 मे ः 11 
2 मे ः 7 
3 मे ः 13 
4 मे ः 8 
5 मे ः 8 
6 मे ः 5 
एकूण ः 52 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com