Nashik : बिबट्याच्या हल्लात वासरू ठार; शेतकऱ्यांमध्ये दहशत

Leopard
Leopardesakal

नरकोळ (जि. नाशिक) : केरसाणे (ता. बागलाण) येथील दसाणे रस्त्यालगत असलेल्या पोलिसपाटील भाऊसाहेब मोरे यांच्या राहत्या बंगल्यालगत गाई- म्हशीच्या गोठ्यात बांधलेल्या चार महिन्यांच्या वासरावर सोमवारी (ता. ३०) मध्यरात्री बिबट्याने हल्ला करून ठार केले. त्यामुळे या भागातील पशुधन धोक्यात आले आहे. (Calf killed in leopard attack Fear among farmers Nashik News)

भाऊसाहेब मोरे यांचे दसाणा रोडलगत गट नंबर १३ मध्ये वास्तव्य असून, नेहमीप्रमाणे गाई- म्हशी गोठ्यात बांधलेल्या होत्या. रात्री शांत वातावरणात या बिबट्याने अचानक हल्ला केला. सध्या कडक उन्हाळा असल्याने पाण्याच्या शोधात त्याने वासरावर हल्ला केला असल्याचे बोलले जाते. या परीसरात पशुधन आजच्या धावपळीच्या जीवनातही टिकून असून, बिबट्याच्या हल्ल्याने पशुधन धोक्यात आले आहे. या बिबट्याचा वन विभागाने पिंजरा लावून बंदोबस्त करावा, अशी मागणी केरसाणे- दसाणे ग्रामस्थांनी केली आहे. या हल्ल्यात पाटील यांचे दहा ते अकरा हजारांचे नुकसान झाले असून, वनरक्षक हरी अहिरे यांनी पंचनामा केला. या वेळी दिलीप मोरे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

Leopard
नामपूर शिक्षक पतसंस्थेचे अडकले 5 कोटी

"केरसाणे, दसाणे परीसर हा पशुधनाच्या बाबतीत अग्रेसर असून, प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात गाय, म्हशी, बैलजोडी आवर्जून दिसते. बिबट्याच्या वावरामुळे पशुधनाला धोका असून, या बिबट्याचा बंदोबस्त करावा."

- भाऊसाहेब मोरे, प्रगतिशील शेतकरी, केरसाणे (ता. सटाणा)

Leopard
Nashik : घरबसल्या ऑनलाइन पहा; महापालिका महिला आरक्षण सोडत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com