Nashik News: त्या’ बंदीवानाने पुन्हा चावी गिळली? महिनाभरापूर्वीच उपचार

captive swallowed key again nashik news
captive swallowed key again nashik news
Updated on

Nashik News : येथील नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातील बंदीवानाच्या पोटात दुखत असल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, त्याने चावी गिळल्याचे बोलले जाते. (captive swallowed key again nashik news )

मात्र याच बंदीवानास गेल्या महिन्यातही चावी गिळंकृत केल्याने जिल्हा रग्णालयात दाखल केले असता, त्यावेळी उपचार करून त्याची चावी निघाली होती. मात्र पुन्हा तोच कित्ता त्याने गिरविल्याने त्याच्या अशा प्रकारामुळे शंका घेतली जाऊ लागली आहे.

विजय रामचंद्र सोनवणे (४०, रा. नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह, नाशिकरोड) असे चावी गिळकृंत करणाऱ्या बंदीवानाचे नाव आहे. सोनवणे हा खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगतो आहे. गेल्या शनिवारी (ता.२५) त्याच्या पोटात दुखत असल्याने त्यास जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले होते.

captive swallowed key again nashik news
Nashik News: हरवलेलं नात गवसले, पण दीड वर्षांनंतर... नातवाने शोधली वर्षापूर्वी हरवलेली आजी

उपचार करून त्यास पुन्हा मध्यवर्ती कारागृहात नेण्यात आले. परत महिन्यानंतर त्यास पोटदुखीचाच त्रास होऊ लागल्याने, कारागृहातून त्यास गेल्या शनिवारी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले.

यावरून त्याने पुन्हा चावी गिळकृंत केली की काय, अशी शंका घेतली जाऊ लागली आहे. तसेच, गिळकृंत करतो ती चावी त्याच्याकडे कशी येते आणि तो का गिळंकृत करतो यासारखे प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत.

captive swallowed key again nashik news
Nashik: पोलिसांकडूनच अन्याय होतोय? नागरिकांनो, वाचा फोडण्यासाठी पोलीस प्राधिकरणाकडे करा तक्रार...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com