Sushma Andhare : सुषमा अंधारेंच्या अडचणी वाढल्या! धार्मिक भावना दुखावल्याबद्दल गुन्हा दाखल

शिवसेना नेते संजय राऊत, उपनेते अद्वय हिरे यांच्या पाठोपाठ अंधारे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे.
Sushama Andhare
Sushama Andhareesakal

मालेगाव : शिवसेना (उबाठा) उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याविरुध्द येथील तालुका पोलिस ठाण्यात हिंदू धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यामुळे श्रीमती अंधारे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. शिवसेना नेते संजय राऊत, उपनेते अद्वय हिरे यांच्या पाठोपाठ अंधारे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे. (case filed against Shiv Sena tackeray group deputy leader Sushma Andhare in Malegaon for hurting religious sentiments Nashik Crime News)

येथील तरुण सामाजिक कार्यकर्ता अमन नवलकिशोर परदेशी (रा. संगमेश्‍वर) याने या प्रकरणी तक्रार दिली आहे. अमनने तक्रारीत आपण पुणे येथे उच्च शिक्षण घेत आहोत. २६ डिसेंबरला चिखलओहोळ (ता. मालेगाव) येथे मित्र किरण हिरे याच्याकडे इतर मित्रांसोबत गेलाे असता.

त्याचे मोबाईल फोनवर युट्यूब चॅनेलवर श्रीमती अंधारे यांचे भाषण ऐकण्यास व पहाण्यास मिळाले. या भाषणात त्यांनी हिंदु धर्मीयांचे आराध्य दैवत श्रीराम व श्रीकृष्ण भगवान यांच्याबाबत खोटी, बदनामीकारक, अश्लिल, बेताल व हिंदु धर्मीयांच्या भावना दुखवणारे वक्तव्य केले आहे.

Sushama Andhare
Akola News : जितेंद्र आव्हाडांविरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचीच अकोल्यात पोलिस तक्रार

हे भाषण पाहिल्यानंतर जेष्ठ कायदेतज्ञ ॲडव्होकेट सुधीर अक्कर यांचा कायदेशीर सल्ला घेऊन ही तक्रार दाखल करण्यात आली. तत्पुर्वी अपर पोलीस अधिक्षक व तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले होते.

पोलिसांनी प्राथमिक चौकशी करुन सदर मोबाईल फोनवरील युट्यूब चॅनेलवरील सुषमा अंधारे यांनी दिलेल्या भाषणाची क्लिप ही भारतीय पुरावा कायदा कलम ६५ ब प्रमाणे ग्राह्य मानून श्री. परदेशी यांच्या तक्रारीवरुन श्रीमती अंधारे यांच्याविरुध्द तालुका पोलिस ठाण्यात कलम २९५ (अ) प्रमाणे दखलपात्र फौजदारी अजामीनपात्र गुन्हा दाखल केला आहे.

Sushama Andhare
Modi Lakshadweep Visit: "...पण मणिपूरला जाणार नाही"; PM मोदींच्या लक्षद्वीपमधील फोटोशूटवरुन काँग्रेसचा निशाणा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com