धर्मांतर रॅकेटचे नाशिक कनेक्शन; कुणाल चौधरी उर्फ आतिफला अटक

Nashik
NashikSakal

नाशिक : उत्तरप्रदेशात गाजत असलेल्या धर्मातरणाच्या प्रकरणात तेथील दहशतवाद प्रतिबंधक विभागाने (ATS) रविवारी लखनऊमध्ये ३ जणांना अटक केली आहे. त्यापैकी एक जण नाशिकचा असून, त्यामुळे धर्मांतरण प्रकरणात नाशिक कनेक्शन पुढे आले आहे.


एटीएसच्या पथकाने अटक केलेल्या तिघांमध्ये नाशिकचा कुणाल अशोक चौधरी उर्फ आतिफ, मुजफ्फरनगर (उत्तर प्रदेश) येथील मोहम्मद शरीफ कुरैशी व मोहम्मद इदरीस यांचा समावेश आहे. दरम्यान, संशयित कुणालच्या अटकेबाबत नाशिकचे पोलीस मात्र अनभिज्ञ असून, उत्तरप्रदेशात ही कारवाई झालेली असल्याने, स्थानिक यंत्रणा सतर्क झाली आहे. उत्तर प्रदेश एटीएसने या तिघांकडून कुवैतसह अन्य काही देशांतून धर्मांतरणासाठी २० कोटी रुपये जमविल्याचा, तसेच उत्तर प्रदेशात जूनमध्ये उघड झालेल्या बेकायदेशीर धर्मांतराचे देशव्यापी रॅकेट आणि धर्मांतर करण्यासाठी परदेशातून निधी संकलनाच्या रॅकेटमध्ये सहभागाचा आरोप आहे.

Nashik
नाशिक : रोजच्या पावसामुळे कांदे वाफ्यातच मृत, मकाचेही नुकसान!


या प्रकरणात एटीएसने जूनमध्ये मौलाना उमर गौतमला, तसेच मेरठ येथून नुकतेच मौलाना कलीम सिद्दीकीला अटक केली होती. सलीमने सिद्दीकीला १७ वर्षे धार्मिक धर्मांतर करण्यात मदत केली. त्याचप्रमाणे इद्रिस आणि चौधरी यांनीदेखील सिद्दीकीला मदत केली आहे. अटक केलेले तिघे मौलाना कलीम सिद्दीकीचे साथीदार असून, सिद्दिकी ५ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत आहे. दरम्यान, एटीएसने आतापर्यंत देशाच्या विविध भागातून १० ते १२ जणांना अटक केली आहे. वेगवेगळ्या नावाने चालवले जाणाऱ्या विश्‍वस्थ संस्था (ट्रस्ट)मध्ये धर्मांतरासाठी परदेशी निधी वापरला जात होता, असे उत्तर प्रदेश एटीएसच्या तपासात पुढे येत आहे.

नाशिक कनेक्शन

आतिफ उर्फ कुणाल नावाच्या व्यक्तीला नाशिक रोडच्या आनंदनगर भागातून अटक करण्यात आली आहे. तो शहरात कुणाल नावाने राहायचा. विदेशातून वेगवेगळ्या खात्यांमधून २० कोटी रुपये अतिफ उर्फ कुणालच्या खात्यात कुठून आले, याचा तपशील शोधण्यात येत असून, त्याची चौकशी सुरू असल्याचे बोलले जाते.

Nashik
'आता नदीला पूर, नंतर आसवांचा महापूर!'; आदिवासींची व्यथा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com