बनावट साठेखत करून फ्लॅटची परस्पर विक्री

Fraud case
Fraud caseesakal

नाशिक : नाशिक रोड परिसरातील धोंगडे नगरमध्ये नवीन इमारतीमध्ये फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून त्याचे बनावट साठेखत तयार केले. मात्र, सदरचा फ्लॅट परस्पर दुसऱ्याला विकून महिलेची तीन लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी नाशिक रोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सदर गुन्हा नाशिक रोड दिवाणी न्यायालयाच्या आदेशान्वये दाखल करण्यात आला आहे.

कविता किरण धोंगडे (रा. माधव शिल्प अपार्टमेंट, दत्तमंदिर रोड, नाशिक रोड) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित महेश गंगवाणी, विजय गंगवाणी, दिलीप गंगवाणी (तिघे रा. कृपा लॉजिंग, साई किरण फर्निचरजवळ, दत्तमंदिर रोड नाशिक रोड) व मधू लक्ष्मण महतानी (रा. सेव्हन वंडर्स, स्वामी समर्थ मंदिरामागे दत्तमंदिर रोड, नाशिक रोड), नितीन मधुकर जगळे (रा. शिवतीर्थ बंगला, जगताप मळा, नाशिक रोड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Fraud case
स्वस्त सोने खरेदीचे आमिष पडले महागात; दाम्पत्याला साडेचार लाखांचा चुना

संशयितांनी शिवाजी धोंगडे मार्गावरील भूखंडावर हेमगिरी बिल्डर्सतर्फे हिमगिरी हाईट्स या नावाची चार मजली इमारती बांधण्यात येत असल्याचे तक्रारदार कविता धोंगडे यांना सांगितले. यासंदर्भात संशयितांनी १ एप्रिल २०११ ते १ जून २०११ यादरम्यान महिलेशी वारंवार संपर्क साधून त्यांना नियोजित बिल्डिंगमध्ये दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट २०२ हा ९८६ चौरस फुटाचा फ्लॅट देण्याचे आमिष दाखविले.

त्यानुसार संशयितांनी बनावट साठेखत करून महिलेकडून तीन लाख रुपये घेतले. मात्र सदरील फ्लॅट कविता धोंगडे यांना न देता, तो दुसऱ्याला विकून त्यांची फसवणूक केली. सदरची बाब समोर आल्यानंतर धोंगडे यांनी नाशिक रोड दिवाणी न्यायालयात धाव घेतली. त्यानुसार न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश नाशिकरोड पोलीसांना देत गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहाय्यक निरीक्षक डगळे करीत आहेत.

Fraud case
स्पेशल 26' चित्रपटाच्या कथेप्रमाणे "एसीबी'चे अधिकारी असल्याचे भासवून थेट नगररचना उपसंचालकालाच लुटण्याचा प्रयत्न

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com