धक्कादायक! पिकअप गाडीवर नाव "जय बजरंग बली" अन् आत मात्र अंगावर काटा आणणारी गोष्ट..

pickup bajrang ozar.jpg
pickup bajrang ozar.jpg

नाशिक / ओझर : रविवारी (ता.२६) रात्री पावणे बाराच्या सुमारास ओझर साकोरे मिग या रस्त्यावरील गोंदकर वस्तीजवळ एक गाडी जात होती. ज्या गाडीवर जय बजरंग बली आणि कानिफनाथ असे नाव असलेली पिकअप (क्रमांक एमएच १५ बीजे ४३१४ ) होती. त्या पिकअप गाडीमध्ये जे काही होते ते अंगावर काटा आणणारे होते... 
 

अशी घडली घटना...
रविवारी (ता.२६) रात्री पावणे बाराच्या सुमारास ओझर साकोरे मिग या रस्त्यावरील गोंदकर वस्तीजवळ गाडीवर जय बजरंग बली आणि कानिफनाथ असे नांव असलेल्या पिकअप गाडीमधून कत्तलीसाठी नेण्यात येणारी दोन गाई व चार वासरे ही त्यांची तोंडे दोरांने बांधून निर्दयपणे अवघडलेल्या अवस्थेत घेऊन जात असल्याचे शेतकरी अनिल बोरस्ते यांच्या लक्षात आले. याची खबर परिसरांत पसरल्याने नागरिकही मुक्या प्राण्यांची सोडवणुक करण्यासाठी सरसावले. कोरोनाचे गांभिर्य नसणाऱ्यांना त्यांनी चांगलाच धडा शिकवला पिकअप गाडीच्या काचा फोडल्या तर टायर टुबही फोडण्यात आले. पोलीस निरिक्षक भगवान मथुरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन गाई व वासरे त्ताब्यात घेतली व नईम फारुख कुरेशी ( २८ ) शाहरूख सलीम कुरेशी (२३) अल्तमस सलीम कुरेशी (२१) सलीम सुलेमान कुरेशी ( ५०) सर्व राहणार चांदणी चौक ओझर व मुन्ना बशीर सैय्यद (३५ ) रा साकोरे मिग या पांच आरोपींना अटक करण्यात आली 

दोन लाख दोन हजार रुपयांचा माल

आदिवासी भागातून कोंबून आणण्यात आलेल्या जनावरानंतर सफेद रंगाची महींद्रा पिकअप, एमएच १५ईटी ३२८९ हिरो कंपनीची मोटारसायकल, बिना नंबरची मोटार सायकल असा दोन लाख दोन हजार रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला. दरम्यान पशुवैद्यकिय अधिकारी करण पवार यांनी या जनावरांवर औषधोपचार करून पहाणी करण्यात आली पोलीस निरिक्षक भगवान मथुरे यांनी चारा पाण्याची व्यवस्था केली.

गुन्हा दाखल करून अटक
ओझर पोलीस ठाण्यात आरोपींवर जिल्हाधिकारी यांचे संचारबंदी आदेशाचे उल्लंघन व भारतात कोरोना विषाणुच्या प्रादुर्भाव संचारबंदी आदेश उल्लघंन १९६० कलम११, ११(१ ) घ (ड) महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम६ (१) भांदवी १८८, ३४प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस निरिक्षक भगवान मथुरे यांचे मार्गदर्शना खाली पोह व्ही एस गायकवाड करत आहे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com