
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जंयतीनिमित्त त्यांच्या पुस्तकांचे वाचन करुन 14 एप्रिल हा दिवस वाचन दिन म्हणून घरातच साजरा करावा, असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नागरिकांना केले आहे.
''भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त पुस्तकांचे वाचन करुन घरातच जयंती साजरी करा''
नाशिक : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जंयतीनिमित्त त्यांच्या पुस्तकांचे वाचन करुन 14 एप्रिल हा दिवस वाचन दिन म्हणून घरातच साजरा करावा, असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नागरिकांना केले आहे.
आंबेडकरांची शिकवण आत्मसात करा...
श्री. भुजबळ म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी करोडो लोकांना अज्ञानाच्या अंधारातून बाहेर काढून ज्ञानाचा प्रकाश दाखवला, बौद्ध धर्माची दीक्षा दिली. भारताला एक अप्रतिम असे संविधान लिहून दिले आणि त्या संविधानातच भारतावर ज्या ज्या वेळेस कोरोनासारखी भीषण संकट येतात त्या त्या वेळी उपयोगात येणारे वेगवेगळे कायदे त्यांनी नमूद केले आहेत. या कायद्यांच्या आधारेच केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाने कोरोनापासून आपल्या व्यक्तीला वाचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे.
पुस्तकाचे वाचन आपण घराघरात करूया...
राज्यात कोरोनाचे वाढते संकट बघता नुकताच 11 एप्रिलला आपण महात्मा फुले यांचा जन्मदिवस एक ज्ञानाचा दिवालावून घरात साजरा केला. त्याचप्रमाणे बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा अतिशय थोर असे ज्ञानी पुरुष होते. अनेक पुस्तक त्यांनी लिहिली आणि उपदेश केला की, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. त्यांची ही शिकवण डोळ्यासमोर ठेवून 14 एप्रिलला निश्चितपणे त्यांनी जे अनेक पुस्तकं लिहिली त्याचे वाचन आपण घराघरात करूया व त्यांनी केलेला उपदेशाचे पुन्हा एकदा स्मरण करूया, असेही त्यांनी सांगितले .
हेही वाचा > मुलाला उच्चशिक्षित करण्याची 'त्यांची' इच्छा अपूर्णच...काळ असा आला की...मुलगाच
कोरोनापासून बचावासाठी बाबासाहेबांची जयंती, जी आपण खरे तर मोठ्या उत्साहाने महिनाभर साजरी करत असतो; परंतु यावेळी आपल्याला तसं करता येणार नाही. घरातच आपण हा दिवस वाचन दिन म्हणून साजरा करूयात. केंद्र शासनाला व महाराष्ट्र शासनाला सहकार्य करुन बाहेर न जाता घरातच बाबासाहेबांचे स्मरण करुयात, असेही आवाहन पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी केले आहे.
हेही वाचा > धक्कादायक! रागाच्या भरात 'त्याचे' हात देखील थरथरले नाही...बायकोला तर पेटवलंच अन् स्वत:देखील...
Web Title: Celebrate Birth Anniversary Reading Dr Babasaheb Ambedkars Books
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..