Nashik | सोनसाखळी चोरट्यांसह सराफ व्‍यावसायिक गजाआड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

two arrested

Nashik | सोनसाखळी चोरट्यांसह सराफ व्‍यावसायिक गजाआड

नाशिक : रस्‍त्‍याने पायी चाललेल्‍या महिलेच्‍या गळ्यातील सोनसाखळी ओरबडणाऱ्या चोरट्यांना गुन्‍हे शाखा युनिट एकच्‍या पथकाने गजाआड केले आहे. तसेच चोरट्यांकडून दागिने खरेदी केलेल्‍या सराफ व्‍यावसायिकासही अटक केली आहे. संशयितांनी चार गुन्‍ह्यांची कबुली दिली आहे.

गोपनीय माहितीच्याआधारे कारवाई

पोलिसांनी संशयित सईद आसमोहंमद सय्यद ऊर्फ छोट्या (वय २९, रा. पखाल रोड) आणि आफताब नजीर शेख (नाशिक) यांच्यासह सराफ व्‍यावसायिक विशाल दुसाने आणि मध्यस्‍थ अजय सिंग यालाही ताब्‍यात घेतले आहे.
दरम्‍यान, उपनगर परिसरातील कदम मळा येथून गेल्‍या आठवड्यात महिलेची सोन्‍याची पोत ओरबडली होती. पोलिसांनी या गुन्‍ह्याचा तपास करताना सीसीटीव्‍ही फुटेज तपासले. त्‍याआधारे संशयितांची ओळख पटविली. त्‍यातच गुन्हे शाखा युनिट एकचे अंमलदार रवींद्र बागूल यांना संशयितांपैकी एक पंचवटीतील गणेशवाडीतील साई मंदिरासमोर येत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्‍याआधारे युनिट एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचत पथकाने संशयिताला ताब्‍यात घेतले. पोलिसी खाक्‍या दाखवत चौकशी केली असता, कदम मळ्यातील स्नॅचिंग केल्‍याची त्‍याने कबुली दिली. पोलिसांनी संशयिताकडून १७ ग्रॅम वजनाचे ७३ हजार रुपयांचे मंगळसूत्र आणि गुन्ह्यात वापरलेली ८० हजार रुपयांची दुचाकी, असा दीड लाखांचा मुद्देमाल हस्‍तगत केला.

हेही वाचा: बारा बलुतेदारांनी उंचावली सोनजची मान! Inspirational News

या दरम्‍यान तपासात त्याने मुंबई नाका, गंगापूर व उपनगर पोलिस ठाण्यांच्या हद्दीतही साथीदार आफताब शेख याच्‍या मदतीने सोनसाखळी ओरबाडल्याची कबुली दिली आहे. चोरीनंतर दागिने त्‍यांचा मित्र अजय सिंग याच्‍या माध्यमातून सराफ व्‍यावसायिक विशाल दुसाने याला विकल्याचे तपासात समोर आले आहे. त्‍यामुळे दोघा संशयितांसह मध्यस्‍थ व व्‍यावसायिकालाही पोलिसांनी ताब्‍यात घेतले आहे. चौघांचा ताबा उपनगर पोलिसांना सोपविला आहे. सहाय्यक निरीक्षक महेश कुलकर्णी, अंमलदार रवींद्र बागूल, नाझीम पठाण, प्रदीप म्हसदे, योगीराज गायकवाड, विशाल देवरे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

हेही वाचा: इगतपुरी तालुक्यात साठ टक्के भात उत्पादनावर पाणी; शेतकरी बेजार

loading image
go to top