Chandra Grahan 2022 : ग्रहण सुटताच रामतीर्थावर स्‍नानासाठी गर्दी

Bathing by devotees at ram tirtha
Bathing by devotees at ram tirthaesakal

नाशिक : ग्रहण काळात विविध संहितांचे पालन करण्याचा सल्‍ला धर्मशास्‍त्रात दिलेला आहे. त्‍यानुसार मंगळवारी (ता. ८) चंद्रग्रहण असल्‍याने दुपारपासून भाविक जप-तप, पोथी वाचनात तल्‍लीन झाले होते. पंचवटीतील रामतीर्थावर पाण्यात उभे राहून जप सुरू होता. तर, ग्रहण सुटल्‍यानंतर सायंकाळी उशिरा स्‍नानासाठी भाविकांनी लक्षणीय गर्दी केली होती.

धर्मशास्‍त्रात विशद केल्‍यानुसार ग्रहण काळातील प्रभाव कमी करण्यासाठी विविध उपाययोजना सुचविलेल्या आहेत. त्‍यानुसार मंगळवारी भाविकांनी दुपारनंतर रामतीर्थ परिसरात एकवटण्यास सुरवात केली होती. रामतीर्थाच्‍या दोन्‍ही बाजूंनी भाविकांनी ठाण मांडला होता. अनेक भाविकांनी ग्रहण काळात पाण्यात उभे राहून जप- तप केला. यामध्ये महिला भाविकांची संख्या लक्षणीय होती. (Chandra Grahan 2022 after moon eclipse ends devotees rush to bath at Ram Tirth Nashik news)

Bathing by devotees at ram tirtha
Nashik : रुग्णवाहिका चालक, डॉक्टरांची हेळसांड; विश्रांतीसाठी रूम देण्यास टाळाटाळ

सायंकाळी ग्रहण सुटताच स्‍नानासाठी अलोट गर्दी रामतीर्थावर बघायला मिळाली. यामुळे रामतीर्थ चोहोबाजूंनी भाविकांनी गजबजला होता. सायंकाळी उशिरापर्यंत भाविकांची वर्दळ येथे बघायला मिळाली. दरम्‍यान, शहर परिसरात अनेक भाविकांनी आपल्‍या कौटुंबिक पातळीवर ग्रहणासंदर्भातील संहितेचे पालन केले.

महिला भाविकांचे लक्षणीय प्रमाण

रामतीर्थावर झालेल्‍या गर्दीत सुमारे पन्नास टक्‍के प्रमाण महिला भाविकांचे होते. अनेक महिलांसोबत त्‍यांचे चिमुकले बालकदेखील येथे हजर होते. सर्ववयोगटातील महिला भाविकांनी उपस्‍थित राहताना जप-तपात सहभाग नोंदविला.

Bathing by devotees at ram tirtha
Nashik Political News : आंबेडकरांच्या "फ्लाईंग व्हिजिट" ने राजकीय चर्चेला वेग!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com