esakal | तृतीयपंथीयांचा हिरमोड! छबिना महोत्सव परंपरेला कोरोनामुळे खंड पडण्याची शक्यता
sakal

बोलून बातमी शोधा

chabina.jpg

नवरात्रोत्सव संपताच त्यानंतर सुरू होणाऱ्या कोजागरी पौर्णिमेनिमित्त हजारो तृतीयपंथी कोजागरी पौर्णिमेच्या छबिना महोत्सवासाठी व देवीच्या दर्शनासाठी एकवटतात. खरंतर वर्षभरातील या कोजागरी पौर्णिमेच्या दिवसाची प्रत्येक तृतीयपंथी वाट पाहतो. कोजागरी पौर्णिमेला तृतीयपंथी भाविकांच्या उत्साहाबरोबरच कावडधारकांचाही उत्साह वेगळाच असतो.

तृतीयपंथीयांचा हिरमोड! छबिना महोत्सव परंपरेला कोरोनामुळे खंड पडण्याची शक्यता

sakal_logo
By
योगेश सोनवणे

नाशिक / दहीवड : महाराष्ट्रातील वेगवेगळी शक्तिपीठ आणि या शक्तिपीठांवर पाहायला मिळणारी देवीची वेगवेगळी रूपं. या रूपांकडे प्रकर्षाने बघितले तर नर व नारी म्हणजे शिव व शक्तीचे मिलन. या दोन्ही रूपांमधला घटक सप्तशृंगगडावर कोजागरी यात्रेनिमित्ताने एकत्रित येतो आणि मग रंगतो तो जल्लोष म्हणजे तृतीयपंथींचा छबिना..! 

कोजागरी पौर्णिमेच्या दिवसाची प्रत्येक तृतीयपंथी वाट पाहतो
नवरात्रोत्सव संपताच त्यानंतर सुरू होणाऱ्या कोजागरी पौर्णिमेनिमित्त हजारो तृतीयपंथी कोजागरी पौर्णिमेच्या छबिना महोत्सवासाठी व देवीच्या दर्शनासाठी एकवटतात. खरंतर वर्षभरातील या कोजागरी पौर्णिमेच्या दिवसाची प्रत्येक तृतीयपंथी वाट पाहतो. कोजागरी पौर्णिमेला तृतीयपंथी भाविकांच्या उत्साहाबरोबरच कावडधारकांचाही उत्साह वेगळाच असतो. कावडधारक भाविकही नंदुरबार, नवापूर, दोंडाईचा, शिरपूर, धुळे तसेच मध्य प्रदेशातील भाविक देवीच्या जलाभिषेकासाठी आपापल्या भागातून तीर्थ कावडीआधारे घेऊन येतात आणि सर्व ठिकाणचे तीर्थ एकत्र करून कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी देवीला त्या तीर्थांनी स्नान घातले जाते. त्याचवेळी समाजाकडून दुर्लक्षित तृतीयपंथींचा छबिना व मिरवणूक भाविकांना आकर्षित करते. तृतीयपंथी कोजागरी पौर्णिमेला आपापल्या जवळील देवीच्या मूर्तींची सजावट करतात आणि शिवालय तीर्थावरून तृतीयपंथींच्या छबिना निघतो.

कोरोनामुळे खंड पडण्याची शक्यता

साधरणात: ३० ते ३५ हजार तृतीयपंथी भाविक कोजागरीसाठी हजेरी लावतात. पूर्वीपासून सप्तशृंगगडावर कोजागरी पौर्णिमेस नगन्य असे तृतीयपंथीय देवीच्या दर्शनासाठी येत. सप्तशृंगगडावर कोजागरी पौर्णिमा उत्सव व कावडयात्रा संपन्न होते. तृतीयपंथींचा छबिना भाविकांसाठी एक पर्वणीच असतो. परंतु यंदाच्या वर्षांच्या कोजागरी उत्सवाला, तृतीयपंथीयांच्या धार्मिक परंपरेला कोरोनामुळे खंड पडण्याची शक्यता आहे. 
 

हेही वाचा > गुजरातहून औरंगाबादला पोहचवायचे होते 'घबाड'; पोलिसांच्या कारवाईने फिस्कटला प्लॅन

युवकांसह ज्येष्ठांची गर्दी

देवीची प्रचीती व महिमा सर्वदूर पसरल्याने देशभरातील तृतीयपंथीयांची कोजागरी पौर्णिमेस सप्तशृंगगडावर उपस्थिती वाढू लागली आहे. हजारो तृतीयपंथी भाविक कोजागरीसाठी उपस्थित असतात. या दिवशी लाखो भाविक आदिमायेच्या दर्शनाबरोबरच तृतीयपंथींच्या आशीर्वादासाठी युवकांसह ज्येष्ठांची गर्दी होते. पण कोरोनाने यंदा होत्याचं नव्हतं झालं. यंदाचा देवीचा कोजागरीचा उत्सव आम्ही सर्वजण आपापल्या घरी करणार आहोत. -भास्कर शिरसाठ, तृतीयपंथींचे गुरू, मुंबई 

हेही वाचा > एक वाईनची बाटली पडली तब्बल सव्वा लाखाला; भामट्याने केले बॅँक खाते साफ

संपादन - ज्योती देवरे 

loading image