esakal | VIDEO : 'कांदा निर्यात संदर्भात निर्णय होईपर्यंत शेतकऱ्यांनी संयम बाळगावा'
sakal

बोलून बातमी शोधा

chhagan bh.jpg

पत्रकारांशी संवाद साधतांना ना. छगन भुजबळ म्हणाले की, केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत असंतोष आहे. याबाबत आपण  माननीय शरद पवार साहेब यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी निर्यात बंदी उठवण्याबाबत काम सुरु असल्याचे सांगितले. परंतु कांदा निर्यात बंदी अद्याप सुरु असल्याने व बाजारात कांद्याची आवक वाढल्याने कांद्याचा बाजारभाव घसरत आहे. याबाबत आपण खा.शरद पवार यांच्याशी संपर्क साधून केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करून लवकरात-लवकर कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी प्रयत्न करावे अशी विनंती करणार आहे.

VIDEO : 'कांदा निर्यात संदर्भात निर्णय होईपर्यंत शेतकऱ्यांनी संयम बाळगावा'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कांदा निर्यात बंदी उठविण्याबाबत केंद्र शासनाकडे पाठपुरावा असून शेतकऱ्यांनी कांदा निर्याती संदर्भात निर्णय होईपर्यंत शेतकऱ्यांनी संयम व शांतता बाळगावी असे आवाहन राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री ना.छगन भुजबळ यांनी केली आहे. आज विधान भवन येथे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री मा.छगन भुजबळ यांनी कांदा प्रश्नावर पत्रकांराशी संवाद साधला.

छगन भुजबळ यांचे शेतकऱ्यांना आवाहन... 

यावेळी पत्रकारांशी संवाद साधतांना ना. छगन भुजबळ म्हणाले की, केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत असंतोष आहे. याबाबत आपण  माननीय शरद पवार साहेब यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी निर्यात बंदी उठवण्याबाबत काम सुरु असल्याचे सांगितले. परंतु कांदा निर्यात बंदी अद्याप सुरु असल्याने व बाजारात कांद्याची आवक वाढल्याने कांद्याचा बाजारभाव घसरत आहे. याबाबत आपण खा.शरद पवार यांच्याशी संपर्क साधून केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करून लवकरात-लवकर कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी प्रयत्न करावे अशी विनंती करणार आहे. त्यामुळे निर्याती संदर्भात निर्णय होईपर्यंत शेतकऱ्यांनी संयम बाळगावा अशी विनंती ना. छगन भुजबळ यांनी शेतकऱ्यांना केली.

हेही वाचा > जेव्हा लॉजवर गणवेशधारी शाळकरी मुलामुलींची धांदल उडते....पोलिसही चक्रावले!

हेही वाचा > लष्करी जवानाकडून जेव्हा पत्नीची हत्या होते तेव्हा...धक्कादायक घटना!

loading image