Nashik News: सुरगाणा तालुक्यातील चिंचपाड्याला डोंगऱ्या देव उत्सवाची धामधूम

सुरगाणा तालुक्यातील चिंचपाडा लाडगाव येथे डोंगऱ्या देव उत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला.
Tribal brothers celebrating Dongra Dev with enthusiasm at Chinchpada in Surgana taluka
Tribal brothers celebrating Dongra Dev with enthusiasm at Chinchpada in Surgana talukaesakal

सुरगाणा : सुरगाणा तालुक्यातील चिंचपाडा लाडगाव येथे डोंगऱ्या देव उत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला आहे.

या उत्सवात नाना प्रकारची आदिवासी लोकगीते, लोकांच्या हातात असलेली घुंगरू काठीबांबूचा खराटा, पावरी वाद्य आणि सोबत टाळ्यांचा आवाज अन् तोंडातून भूररर..! असा आवाज आदिवासी भागातील रानात, डोंगर दऱ्यांच्या कपारीत घुमत आहे. आदिवासींच्या डोंगऱ्या देव उत्सवाची जोरदार धूम या सुरगाणा तालुक्यात चालू आहे.

आदिवासी आम्ही डोंगरवासी, चंद्र सूर्यापासून आदिवासी यासारखी विविध गीते पावरीच्या तालावर म्हटली जात आहेत. (Chinchpada in Surgana taluka celebrated Dongrya Dev Utsav nashik news)

पावरीचे सुरेल सूर व आदिवासी गीत कानावर पडले की आदिवासी बांधवांची जीवन कहाणी व समाजाचे संपूर्ण चित्रच डोंगऱ्या देव उत्सवाच्या निमित्ताने उभे राहते. या उत्सवाला मोठी परंपरा आहे. हा उत्सव मोठ्या आनंदाने व भक्तिभावाने साजरा केला जातो. याच उत्सवाला भाया असेही म्हणतात.

सुरगाणा तालुक्यातील चिंचपाडा, लाडगाव, वावरपाडा, दुर्गापूर, शिंदे, सराड आदी गावातील भाया उत्सव प्रसिद्ध असून, हा कार्यक्रम पाहण्यासाठी दूरवरून लोक येत असतात. आदिवासी बांधवांची निसर्गावर अपार श्रद्धा असल्याने जंगलातील पशूपक्षी, वाघ देव, नागदेव, मोर, चंद्र-सूर्य हेच त्यांचे दैवत असल्याने गावाच्या वेशीवर किंवा रस्त्यावरील बारीत वाघदेवाची मूर्ती दिसून येते. काही देवांना ठराविक नावाने ओळखले जाते. यात हिरवा, कंसरामाता, लक्ष्मी, रानवा हनुमान शंकर भगवान आदी देवतांची अखंड दीप लावून सलग चार दिवस पूजा केली जाते.

गावातील हनुमानाच्या मंदिराजवळ किंवा मोकळ्या जागेत पाच माऊलींच्या हातून देवतांडा उभा केला जातो. या जागेवर मुळासकट उपटून आणलेले झेंडूचे रोपटे लावतात. या देवतांजवळ मोराच्या पिसांचा गुच्छ, काकडी, नागलीचे दाणे, उडदाचे दाणे ठेऊन दिवा ठेवला जातो. कार्यक्रमाच्या ठरविलेल्या मुदतीप्रमाणे चार,पाच, सहा किंवा बारा दिवस या थोम्बाजवळ माऊल्या फेर धरून नाचतात.

Tribal brothers celebrating Dongra Dev with enthusiasm at Chinchpada in Surgana taluka
Datta Jayanti 2023: दत्तजयंती निमित्त श्रीमद् गुरुचरित्र ग्रंथाचा पारायण सोहळा; वाचनासाठी शेकडो सेवेकरी उपस्थित

या उत्सवादरम्यान या टापराला उपवास करून नियम पाळावे लागतात. या माऊल्या सकाळी अनवाणी फिरून शेजारील गावामध्ये जातात. गाणे म्हणून फेर धरून पावरीवर नृत्य करतात. घरोघरी जाऊन धान्य जमा करतात. उत्सवाची समाप्ती करण्यासाठी सर्व माऊल्या व उत्साही नागरिक गावाजवळील डोंगरावर गड जिंकण्यासाठी जातात.

त्या ठिकाणी डोंगराची म्हणजेच डोंगऱ्या देवाची विधिवत पूजा केली जाते. रात्रीच्या वेळी डोंगरावर कार्यक्रम घेतला जातो. अनेक गावांमध्ये दत्त जयंतीनिमित्त या उत्सवाची सांगता होते. त्यानंतर महाप्रसादाचा (गावभंडारा) कार्यक्रम होतो.

"आपल्या गावात सुख शांती लाभो, शेतात काम करताना निसर्गाचा कोप होऊ नये, शेतात पेरलेले पीक चांगले यावे व घर संसाराची भरभराट व्हावी आदी कारणासाठी भाया उत्सव साजरा करून सांगतेच्या वेळी कोंबड्या व बोकडाचा बळी दिला जातो."- हिरामण चौधरी, चौधरी परिवार ग्रामस्थ

Tribal brothers celebrating Dongra Dev with enthusiasm at Chinchpada in Surgana taluka
Sarangkheda Yatra : नाशिकच्या अश्व रणरागिणी चेतक फेस्टिव्हलला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com