esakal | सिडकोची घरे फ्रीहोल्ड कधी होणार? दीड वर्ष उलटूनही शासन निर्णयाची प्रतीक्षा
sakal

बोलून बातमी शोधा

cidco.jpg

सिडकोने घरे सर्वसामान्यांना विकली; परंतु हे करत असताना ही घरे ९९ वर्षांच्या करारावर देण्यात आली. त्यामुळे ९९ वर्षांनंतर पुढे काय, असा प्रश्न आजही सिडकोवासीयांना सतावत आहे.

सिडकोची घरे फ्रीहोल्ड कधी होणार? दीड वर्ष उलटूनही शासन निर्णयाची प्रतीक्षा

sakal_logo
By
प्रमोद दंडगव्हाळ

नाशिक/सिडको : सिडकोची लीजवरील घरे फ्रीहोल्ड होणार, असे म्हणता म्हणता दीड वर्ष उलटून गेले, तरी सिडकोवासीय शासन निर्णयाच्या होल्डवरच आहेत.सिडको कामगार वर्गाची वसाहत आहे. या ठिकाणी हजारोंच्या संख्येने सिडकोने घरे बांधली. ती सर्वसामान्यांना विकली; परंतु हे करत असताना ही घरे ९९ वर्षांच्या करारावर देण्यात आली. त्यामुळे ९९ वर्षांनंतर पुढे काय, असा प्रश्न आजही सिडकोवासीयांना सतावत आहे.

सिडकोची घरे फ्रीहोल्ड कधी होणार?

यासाठी लोकप्रतिनिधी व विविध संघटनांनी शासन स्तरावर पाठपुरावा करून लीजवरील घरेही फ्रीहोल्ड करण्याची मागणी केली. त्यास माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदीलही दाखविला. त्यामुळे सिडकोच्या घरात खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी झाली. या गोष्टीला वर्ष- दीड वर्ष उलटून गेले. या मुद्द्यावर या भागात आमदारही निवडून आले. सत्ता बदलली. मुख्यमंत्री बदलले; परंतु सिडकोच्या घरांच्या फ्रीहोल्डसंदर्भात कुठल्याही प्रकारचा शासन निर्णय अद्यापपर्यंत सिडको कार्यालयाला प्राप्त झालेला नाही. त्यामुळे आजही येथे राहणाऱ्या सिडकोवासीयांचा जीव टांगणीला लागला आहे. या संदर्भात सिडको कार्यालयाशी संपर्क साधला असता, त्यांनी याबाबत दोन बैठका झाल्या आहेत; परंतु अद्यापपर्यंत शासन निर्णय आलेला नसल्याचे सांगितले जात आहे. या संदर्भात त्या गोष्टीचा पाठपुरावा करताना कोणीही दिसत नाही.

हेही वाचा > दुर्दैवी! बैलपोळ्याच्या पूर्वसंध्येला अचानक आलेल्या 'त्या' बातमीने ममदापूर हळहळले..काय घडले नेमके?

दीड वर्ष उलटूनही शासन निर्णयाची प्रतीक्षासिडकोवासीयांना लीजवर देण्यात आलेली घरे फ्रीहोल्ड करण्यासंदर्भात दोन बैठका झाल्या असून, अद्यापपर्यंत फ्रीहोल्डसंदर्भात शासन निर्णय प्राप्त झालेला नाही. या संदर्भात अधिक माहिती घेऊन कळवितो.- प्रशांत ठाकूर, प्रशासक, सिडको कार्यालय, नाशिक

हेही वाचा > धाबे दणाणले! नियुक्ती होऊनही उमेदवार कामावर नाही?कारवाई तर होणारच

संपादन : रमेश चौधरी 

loading image
go to top