job
jobesakal

Nashik | दिवाळीत Good News! हजारो बेरोजगारांना मिळणार नोकऱ्या

नाशिक : अखेर बहुचर्चित सिपेट प्रकल्पाला (CIPET Project) राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत अनेक बेरोजगारांना (unemployment) सुखावणारी ही बातमी अखेर आली आहे.

हजारोंना नोकऱ्यांच्या संधी

सध्या कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. रोजगार निर्मिती घटली आहे, तर कुणाचे उद्योग डबघाईला आले आहेत. अखेर बहुचर्चित सिपेट प्रकल्प नाशिकमध्येच होणार असून त्यासाठी राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. अशा काळात हा प्रकल्प नाशिकमध्ये येणार असल्याची बातमी येऊन धडकली आहे. या प्रकल्पाचा निश्चितीच राज्याच्या प्रगतीत मोठा हातभार लागणार आहे. त्यामुळे हजारो नोकऱ्यांच्या संधी नाशिक जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा तयार होणार आहेत. या प्रकल्पामुळे नाशिकमध्ये हजारो रोजगारांची निर्मिती होणार आहे, अशी माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.

job
दिवाळीत महिला वळल्या चुलीकडे; गॅस दरवाढीमुळे आर्थिक जुळवाजुळव

हा प्रकल्प नाशिकमध्ये आणण्यासाठी प्रयत्न सफळ

केंद्र सरकारने पनवेल येथे हा प्रकल्प उभारायला मंजुरी दिली होती. मात्र, त्यासाठी 15 एकर जागा हवी होती. पनवेल येथे या प्रकल्पासाठी इतकी जागा मिळाली नाही. त्यामुळे हा प्रकल्प राज्याबाहेर जाण्याची भीती होती. याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांना मिळाली. त्यांनी हा प्रकल्प नाशिकमध्ये आणण्यासाठी चक्रे फिरवली. या प्रकल्पासाठी जमीन देण्याची तयारी दर्शवली. याबाबत कंपनीच्या प्रमुखांची भेट घेतली. त्यांच्यासमोर आपली बाजू मांडली. सोबतच नाशिकमध्ये हा प्रकल्प उभारावा यासाठी दिल्लीमध्ये जोर लावला. त्यांनी तत्त्वता मान्यता दिली. त्यानंतर पुन्हा एकदा राज्य सरकारडे या प्रकल्पासाठी तगादा लावला होता.

job
Nashik | ऐन दिवाळीत 3 ST कर्मचाऱ्यांचा आत्महत्येचा प्रयत्न

केंद्र सरकार आणि राज्य सरकार ५०-५० टक्क्यांच्या निधीचा वाटा उचलणार

खासदार हेमंत गोडसे यांनी गोवर्धन शिवारातील एक जागा या प्रकल्पासाठी निश्चित केली. केंद्राच्या पथकालाही या जागेची माहिती दिली. या पथकाला ही जागा दाखवली. त्यानंतर राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू केला. राज्य सरकारनेही आपला वाटा उचलण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार आता केंद्र सरकार पन्नास आणि राज्य सरकार पन्नास टक्क्यांच्या निधीचा वाटा उचलणार आहे. राज्याचे सचिव सीताराम कुंटे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत गोवर्धन शिवाराच्या जागेवर मोहोर उमटवण्यात आली आहे. आता पुढील आठवड्यात या प्रकल्पाबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर केला जाणार आहे.

job
निराधारांची दिवाळी अंधारात; 20 हजार लाभार्थी अनुदानापासून वंचित

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com