On Diwali the women use stove for cooking Economic adjustment due to gas price hike
On Diwali the women use stove for cooking Economic adjustment due to gas price hikeesakal

दिवाळीत महिला वळल्या चुलीकडे; गॅस दरवाढीमुळे आर्थिक जुळवाजुळव

येसगाव (जि. नाशिक) : स्वयंपाकाचा गॅस महागल्याने कसमादेच्या ग्रामीण भागातील महिला सणासुदीच्या दिवसात देखील पारंपारिक चुलीकडे वळल्या आहेत. महागडा गॅसऐवजी चुलीवर स्वयंपाक व दिवाळीचा फराळ करतांना दिसत आहेत. गॅसवर फराळाचे पदार्थ तयार करणेही परवडणारे नाही. त्यामुळे अनेकांच्या घरातून चुलीचा धूर निघत आहे.

ग्रामीण भागातील संस्कृतीत चुलीला लक्ष्मीची उपमा

यांत्रिक युगात शहरी भागात मात्र ही परिस्थिती नाही. साधारण परिस्थिती असणाऱ्यांना वेळेची बचत व महीलांना धावपळीचे जीवन त्यामुळे त्यांना चुलीवर स्वयंपाक करणे परवडणारे नाही. त्यामुळे मिळेल त्या किमतीत गॅस घ्यावा लागतो. ग्रामीण भागात चुलीवरच्या चवदार भोजनाचा आस्वाद मिळू लागला आहे. चुलीवरची बाजरीची खरपूस व कडक पापुद्रयाची कुरकुरीत भाकरी या सोबत वेगवेगळ्या काळ्या मसाल्याच्या व भाजीपाला भाज्यांची चव न्यारीच असते. चुलीवर खापर ठेऊन त्यावरच्या पुरणपोळीचा अस्वाद एक वेगळा आनंद देऊन जातो. ग्रामीण भागातील संस्कृतीत चुलीला लक्ष्मीची उपमा दिलेली असते. दिवाळीला गृहिणी नवीन चूल विकत आणतात. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्याच्यावर फराळाचे गोड पदार्थ तयार केले जातात. तुळशी विवाहानंतर लग्नसराई सुरू होईल. लग्नसराईत ही चुलीला महत्व असते.

On Diwali the women use stove for cooking Economic adjustment due to gas price hike
सावधान! दिवाळीत परगावी जाताना घ्या खबरदारी

कुंभार कारागीर हे दसऱ्याच्या आधीपासून चूल तयार करतात. नदीकाठच्या पोयटा मातीमध्ये घोड्याची लिद, बाजरीच्या बनग्या, भुसा, राख, पाणी आदी वापरून लगदा तयार करून हाताच्या सहाय्याने पर्यावरणपूरक मातीची चूल तयार करतात. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना फिरंगी बाभळी या दिवसात वाढलेल्या असतात. मजूरवर्ग त्याचा वापर सरपण म्हणून करतात. तसेच, बांधावर उघडलेले झाडेझुडपे, शेताच्या बाजूने वाढलेले झाडाच्या निरुपयोगी व वाळलेल्या फांद्या, छाटणी केलेल्या द्राक्षांच्या, बोराच्या, डाळिंबाच्या काड्या व शेवग्याच्या फांद्यांचा वापर महिला शेतकरी सरपण म्हणून उपयोगात आणतात.

''काही महिलांना मातीची चूल हवी असते. तर काही सिमेंटची चूल पसंत करतात. विक्रीसाठी दोन्ही प्रकारचे चुल तयार करावी लागतात. मातीच्या चुलीला ही चांगली मागणी असते. मातीची चुल ६० रुपये, सिमेंटची चुल १२० रुपये.'' - सुनीता काळे, कारागिर, येसगाव बुद्रूक

On Diwali the women use stove for cooking Economic adjustment due to gas price hike
Diwali 2021 | लक्ष्मीपूजनासाठी सायंकाळचे 'हे' 4 तास शुभ

सणासुदीच्या दिवशी गॅसची किंमत वाढलेली आहे. किमान नऊशे तीस रुपये गॅस भरायला लागतात. दिवाळीसाठी जवळ पैसे पाहिजेत. त्या पैशात कपडे किंवा फराळ होऊ शकतो. त्यामुळे सध्या तरी चुलीचा वापर चालू आहे.'' - अनिता सूर्यवंशी, गृहिणी, येसगाव बुद्रुक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com