Nashik News : मुख्य रस्त्याचे अचानक काम बंद; इगतपुरीकर धुळीने त्रस्त

तब्बल पाच वर्षांनंतर शहरातील मुख्य रस्त्याचे काम मागील आठवड्यात सुरू झाले. दोन ते चार दिवस उद्‌घाटनात गेले. अचानक चार दिवसांपासून काम बंद पडले आहे.
Dust from removal of cement layer on old Mumbai-Agra highway.
Dust from removal of cement layer on old Mumbai-Agra highway. esakal

Nashik News : तब्बल पाच वर्षांनंतर शहरातील मुख्य रस्त्याचे काम मागील आठवड्यात सुरू झाले. दोन ते चार दिवस उद्‌घाटनात गेले. अचानक चार दिवसांपासून काम बंद पडले आहे.

रस्त्याचे काम नेमके कशामुळे बंद पडले, असा प्रश्न शहरवासीयांना पडला आहे.(citizens affected by dust due to Sudden work stoppage of main road nashik news)

सार्वजनिक बांधकाम विभागाने तीन लकडीपूल ते बुद्ध विहारपर्यंत रस्त्याचे दोन इंच पापडी आधुनिक मशीनद्वारे काढली. त्यामुळे संपूर्ण रस्त्यावर धूळ साचली. इगतपुरीकरांनी मन घट्ट करून त्रास सहन करण्याचे ठरविले. मात्र, काम बंद झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

रस्त्याच्या कामामुळे पूर्ण शहरात सिमेंटच्या धुळीचे साम्राज्य पसरले आहे. धुळीमुळे नागरिकांना श्वसनाचे विकार होत असून, खोकल्याचा त्रास जाणवत आहे. नागरिकांना चक्क आपल्या तोंडाला मास्क लावून प्रवास करावा लागत आहे. तोंडावर मास्क आल्याने शहरात कोरोनाचा शिरकाव झाला की काय, असे चित्र निर्माण झाले आहे.

Dust from removal of cement layer on old Mumbai-Agra highway.
Nashik News: स्मार्ट सिटीत झेब्रापट्टे दिसेनासे! वाहतूक शाखेच्या पाठपुराव्याला मनपा देईना दाद

सिमेंटच्या धुळीमुळे अनेक झाडे सुकण्याच्या मार्गावर आहेत. दिवसा रस्त्यावर पाणी मारल्यास धूळ कमी होईल. मात्र, रात्री पाणी मारण्याचे नेमके कारण काय, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. दिवसा पाणी मारले तर कमीत कमी धूळ बसून त्याचा त्रास नागरिकांना जाणवणार नाही. त्यामुळे पाणी मारण्याची वेळ बदलण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

नाताळच्या सुटट्यांमध्ये पर्यटकांनी इगतपुरीकडे पाठ फिरविली. धुळीच्या साम्राज्यामुळे रस्त्यालगत असणाऱ्या व्यवसायिकांना फटका बसत आहे. धूळ खाद्यपदार्थांवर जाऊन बसते. दिवसभर दुकानची साफसफाई करावी लागते. खाद्यपदार्थ झाकून ठेवावे लागत आहेत. रस्त्याच्या एका बाजूचे अतिक्रमण काढले.

मात्र, येणाऱ्या निवडणुका लक्षात घेता मतांवर परिणाम होऊ नये, यासाठी दुसऱ्या बाजूचे अतिक्रमण काढण्यास हेतूपुरस्कर टाळाटाळ केल्याची चर्चा नागरिकात रंगली आहे. एकंदरित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

Dust from removal of cement layer on old Mumbai-Agra highway.
Nashik ZP News : जि. प. च्या सर्व संवर्ग सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com