Nashik Crime News : शहर पोलिसांची अवैध धंद्याविरुद्ध धडक कारवाई

crime news
crime news esakal

Nashik Crime News : शहरातील अवैध धंद्यांविरुद्ध पोलिसांकडून सातत्याने कारवाई सुरू आहे. असे असतानाही गेल्या दोन दिवसात नाशिक रोड परिसरात ठिकठिकाणी छापेमारी करीत अवैधरीत्या सुरू असलेल्या दारूअड्ड्यांवर धडक कारवाई केली.

याप्रकरणी नाशिक रोड, देवळाली कॅम्प पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. (City police crack down on illegal businesses Nashik Crime News)

नाशिक रोड पोलिसांना एकलहरे रोडवरील बाजार समितीजवळ बेकायदेशीररीत्या दारू विक्री सुरू असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार शनिवारी (ता. ८) रात्री छापा टाकला असता, संशयित सनी राजेंद्र जाधव (२८, रा. सिन्नर फाटा) हा अवैधरीत्या दारू विक्री करताना मिळून आला.

पोलिसांनी ४९० रुपयांच्या बाटल्या जप्त केल्या. पोलिस शिपाई वाजे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच, सामनगाव रोड भागात विकी चंदू चव्हाण (रा. सामनगाव रोड) हा रविवारी (ता. ९) दुपारी कॉलेज परिसरातील पाट किनाऱ्याजवळ एका झाडाखाली अवैधरीत्या दारू विक्री करताना मिळून आला.

संशयित चव्हाणच्या ताब्यातून देशी मद्याचा १ हजार ४७० रुपयांचा साठा जप्त केला. हवालदार शंकर काळे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तर, चेहडी बुद्रूक येथील एकलव्यनगर भागात संशयित किशोर अशोक जाधव (रा. दारणा हॉटेल समोर, चेहडी बु.) हा रविवारी (ता. ९) सायंकाळी एका टपरीच्या आडोशाला अवैधरीत्या दारू विक्री करताना मिळून आला.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

crime news
Crime news : सावधान! फ्री फायर गेमच्या माध्यमातून अपहरणाची धमकी

त्याच्या ताब्यातून एक हजार ५४० रुपये किमतीचा दारू साठा जप्त करण्यात आला. पोलिस शिपाई राकेश बोडके यांच्या फिर्यादीनुसार नाशिक रोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, संशयित शिवाजी बोराजी कुंदे (रा. कोळीवाडा, लहवित) हा घराच्या भिंतीलगत मद्य विक्री करताना मिळून आला.

त्याच्या ताब्यातून सुमारे ७०० रुपये किमतीचा साठा हस्तगत करण्यात आला. पोलिस नाईक भोईर यांनी दिलेल्या तक्रारीवरून देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime news
Nashik Crime News: विनामस्तक धड आढळल्याने खळबळ; तीन वर्षीय बालिकेचे धड...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com