Nashik Rain Update : सिन्नर परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस | Latest Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Heavy Rain in Sinnar

Nashik Rain Update : सिन्नर परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस

सिन्नर (जि. नाशिक) : तालुक्यातील अवघ्या सहा ते सात किलोमीटर असलेल्या मुसळगाव शिवारात ढगफुटी सदृश्य पावसाने हाहाकार केल्याने, अनेक पिके असलेल्या शेतात तुडुंब पाणी भरल्याने शेतकरी राजाचा हाती आलेला घास हिरावून गेला आहे.

सुमारे दोन ते तीन तास चाललेल्या पावसाने परत नदी नाले हे संपूर्ण भरून वाहू लागल्याने, अनेक शेती पिके यांची नासधूस झालेली आहे. काही दिवसाच्या उंबरठ्यावर आलेल्या दिवाळीच्या सणावर विरजण पडले असून अनेक कुटुंब या पावसामुळे दुःखाच्या छायेत दिसत आहेत. (Cloudburst heavy rain in Sinnar area Nashik Rain Update Latest Marathi news)

हेही वाचा: Nashik : खचलेल्या रस्त्याचे काम 15 दिवसांपासून बंद

शेतामध्ये साचलेले पाणी

शेतामध्ये साचलेले पाणी

सिन्नर शहरात पुन्हा परत ढगफुटी सदृश्य पावसाने पुनरावृत्ती दिल्याने अनेक घरांच्या उंबरठ्यावर पावसाचे पाणी आलेले आहेत. सोमवारी रात्री अचानक आलेल्या पावसाने सर्वांची झोपच उडाली. मागील काही महिन्यात ढगफुटी सदृश्य पावसाने सिन्नर तालुक्यात होत्याचे नव्हते केलेले होते. अनेकांचे कुटुंब संसार हे रस्त्यावर आलेले होते.

आत्ताच कुठे हे कुटुंब, शहरातील दुकाने सावरलेले असताना, पीक जोमाने उभे राहत असताना अनेकांच्या शेतीत पुन्हा निसर्गाच्या अवकृपेने ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने, अनेकांचे स्वप्न हे धुळीस मिळाले आहे. सिन्नर शहरातील अनेक पूल मागील महिन्यात पाण्याखाली गेलेले होते, कुठेतरी आत्ताच या पुलांचे काम केलेले असताना पुन्हा त्या पुलांवर पावसाचे पाणी आल्याने पुरस्थिती निर्माण झालेली आहे.

अनेक रस्ते बंद झाले आहेत. यामुळे सिन्नर शहरात पुन्हा ढगफुटी सदृश्य पावसाची चर्चा व अनेक नागरिकांनी पावसाची धास्ती घेतलेली आहे. शासनाने लवकरात लवकर दिवाळीच्या आत मदत जाहीर करावी, ही अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.

हेही वाचा: Nashik: स्थळ पाहणीच्या नावाखाली कामांना टप्पे; रजिस्टरबरोबरच ॲपमध्येदेखील नोंदीच्या सूचना