Nashik : खचलेल्या रस्त्याचे काम 15 दिवसांपासून बंद

Partially constructed road.
Partially constructed road.esakal

जुने नाशिक : कठडा सुमन नाईक शाळा परिसरातील रस्ता खचून ट्रकचा अपघात झाल्याची घटना गेल्या महिन्यात घडली होती. महापालिका आयुक्तांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली होती. दिवाळीपूर्वी रस्ता तयार करण्याच्या सूचना केल्या. दिवाळी अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपली असताना अद्याप रस्ता तयार करण्यात आलेला नाही. उलट रस्त्याचे सुरू करण्यात आलेले काम गेले पंधरा दिवसापासून बंद करण्यात आले आहे. नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. (road near kathada suman naik school work closed for 15 days Nashik Latest Marathi News)

कठडा सुमन नाईक शाळा समोरील चार महिन्यापूर्वी काँक्रिटीकरणाचा तयार करण्यात आलेला रस्ता खचून ट्रकचा अपघात घडला होता. आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी घटनास्थळास भेट देत पाहणी केली. या वेळी परिसरातील नागरिकांनी निकृष्ट कामाबद्दल नाराजी व्यक्त केली. आयुक्तांनी याबाबतची गंभीर दखल घेत घटनेची चौकशी करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

तसेच, त्वरित खचलेल्या रस्त्याचे योग्यरीत्या दिवाळीपूर्वी काम पूर्ण करण्याचे आदेशित केले. त्यानंतर रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. खडी, माती टाकून अर्धवट रस्ता तयार करण्यात आला. गेली पंधरा दिवसापासून काम बंद करण्यात आले आहे. त्यामुळे अर्धवट रस्ता तसाच पडून आहे. शिवाय रस्त्याखालून टाकलेला ड्रेनेजचा मोठा पाइपचा पुढील भाग तसाच उघडा ठेवला.

Partially constructed road.
Nashik : ग्रामस्थांना जुलाब, उलट्यांचा त्रास; 40 जणांना लागण झाल्याने भीतीचे वातावरण

त्यातून मोठ्या प्रमाणावर खोलगट खड्ड्यात सांडपाणी वाहत आहे. हा खड्डा अपघातास निमंत्रण देत आहे. परिसरातील लहान मुले खेळताना त्यात पडून दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. दिवाळी अवघ्या पाच ते सहा दिवसांवर येऊन ठेपली असताना अद्याप रस्ता तयार नसल्याने परिसरातील नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रस्त्याचे काम पूर्ववत चालू करून रस्ता तयार करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

"अर्धवट रस्ता तयार करण्यात आला आहे. सोयपेक्षा गैरसोय अधिक होत आहे. उघडा पाइप आणि खड्डा अपघातास निमंत्रण देत आहे. त्वरित रस्ता तयार करण्यात यावा."- रफिक शेख

Partially constructed road.
Nashik Crime : 2 ठिकाणी दरोडा; मारहाण, रोकडसह 3 लाख 38 हजारांचा मुद्देमाल लांबविला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com