CM Eknath Shinde : शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही : मुख्यमंत्री शिंदे

Cm Shinde & Dada Bhuse at survey
Cm Shinde & Dada Bhuse at surveyesakal

Unseasonal Rain Crop Damage : करंजाडी परिसरातील निताणे, बिजोटे, आखतवाडे येथे झालेल्या वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले होते.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेत थेट शेतक-यांच्या बांधावर येऊन पाहणी करीत नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांना धीर देत तीन दिवसात पंचनामे करून मंत्रीमंडळाची बैठक घेऊन नुकसान भरपाई देऊ शेतक-यांना वाऱ्यावर सोडणार नाही अशी ग्वाही दिली. (CM Eknath Shinde statement on unseasonal rain crop damage nashik news)

मुख्यमंत्री श्री. शिंदे पुढे म्हणाले की, मी आयोध्येत प्रभू रामचंद्रांना साकडे घातले की, माझ्या बळीराजाचे संकट दूर कर, नुकसानग्रस्त शेतक-यांच्या शेतात पोहोचून तीन दिवसांत पंचनामे करून तात्काळ आहवाल सादर करावा असे आदेश संबंधित विभागाला देण्यात आले.

वारंवार अवकाळी येते, अतिवृष्टी येते, गारपिट येते माझा बळीराजा मजबूत व स्वाभिमानी आहे. हे संकट येणारे संकट आहे हे थांबवावे, मी स्वतः तुम्हाला भेटायला आलोय, मी मुख्यमंत्री म्हणून आलो मी उपकार नाहीत केले नाहीत तुमच्यावर मीही तुमच्यातलाच आहे.

मला माहित आहे शेतक-यांचे काय दुख आहे काय सर्व अडचणी आहेत. या भागातील पंचनामे होतात आपण त्याच्यावर निर्णय घेऊ आणि शेतकऱ्यांना मदत देऊ. अशी ग्वाही शेतकऱ्यांना दिली.

बागलाण तालुक्यात सलग दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने व गारपिटीने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानीमुळे बळीराजाचे अक्षरशः कंबरडे मोडले असून शेतकरी वर्ग मेटाकुटीस आलेला आहे.

या नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या शेतकरी वर्गास आधार देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बागलाण तालुक्यातील अवकाळी व गारपीटीत नुकसानग्रस्त भागात पाहणी दौऱ्यासाठी आले असता त्यांनी तालुक्यातील निताणे, बिजोटे, व आखतवाडे या गावातील बाधित क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली व शेतकरी वर्गाला धीर देत शासनाकडून तात्काळ पंचनामे करून भरपाईचे आश्वासन दिले,

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Cm Shinde & Dada Bhuse at survey
Unseasonal Rain : करंजाडी खोऱ्यात अतिवृष्टीने होत्याचे नव्हते; शेतकऱ्यांची अवस्था बिकट

यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्याशी चर्चा करताना शेतकरी वर्गाचे अश्रू अनावर झाले होते, "साहेब तुम्हीच सांगा आते जगानं कसं, कांदानं कर्ज फेडानं कसं, पो-यासनी शाळनी फी भराणी कशी, हे आते तुम्हीच सांगा, सगळ संपी गये" अशी साद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बिजोटे येथील युवा शेतकरी चंद्रभान बच्छाव यांनी आपली व्यथा मांडली. यावेळी उपस्थित असणाऱ्यांचे डोळे पानावले होते.

बागलाण तालुक्यात झालेल्या गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात फळबागांचे तसेच कांदा व नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणात झालेले नुकसान दिसून येत होते. या अवकाळी ग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यात मुख्यमंत्री शिंदे यांच्याबरोबर नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे व बागलाणचे आमदार दिलीप बोरसे, माजी आमदार संजय चव्हाण, जिल्हाधिकारी डॉ गंगाधरन्, अप्पर जिल्हाधिकारी माया पाटोळे, प्रांताधिकारी बबनराव काकडे, तहसील जितेंद्र इंगळे-पाटिल, आयुक्त सुनिल चव्हाण,

विभागीय सहसंचालक मोहन वाघ, उपविभागीय कृषी आधिकारी आधिकारी गोकुळ आहिरे, तालुका कृषी आधिकारी सुधाकर पवार, कृषी आधिकारी प्रणय हिरे, पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय आधिकारी प्रदिप जाधव आदी दौ-यात सहभागी होते. यावेळी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Cm Shinde & Dada Bhuse at survey
Unseasonal Rain: डांग सौंदाणेत पाऊस, वादळी वारा अन् सुपारी पेक्षा मोठ्या गारा; पहा Photos

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com