esakal | उज्‍ज्‍वल करिअरसाठी तरुणाईची वैद्यकीय क्षेत्राकडे वाटचाल
sakal

बोलून बातमी शोधा

वैद्यकीय उपचार

उज्‍ज्‍वल करिअरसाठी तरुणाईची वैद्यकीय क्षेत्राकडे वाटचाल

sakal_logo
By
अरुण मलाणी

नाशिक : कोरोना महामारीत (Corona Virus) आरोग्‍य क्षेत्राचे महत्त्व विशद झाले. विशेषतः दुसऱ्या लाटेत (Second wave) कुशल मनुष्यबळाची टंचाई जाणवली. त्यामुळेच संभाव्‍य तिसऱ्या लाटेपूर्वी (Third wave) मुख्यमंत्री महाआरोग्‍य कौशल्‍य विकास कार्यक्रमातून कुशल मनुष्यबळ मिळविण्याचा शासनाचा प्रयत्‍न आहे. नाशिक जिल्ह्यात योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला असून, ८६१ उमेदवारांनी सहभागासाठी नोंदणी केली आहे. या माध्यमातून कौशल्‍य आत्‍मसात करत उज्‍ज्‍वल करिअरसाठी तरुणाई वैद्यकीय क्षेत्राची वाट धरत आहे. (CM-Maha-Arogya-Skills-Development-Program-Youth-towards-the-medical-field-nashik-educational-news)

२० हजार युवक-युवतींना प्रशिक्षणाचे उद्दिष्ट

आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छुक असलेल्या पॅरामेडिकल क्षेत्रातील कौशल्य विकास प्रदान करण्यासाठी ही योजना आहे. राज्‍य शासनाचे कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग आणि महाराष्ट्र राज्‍य कौशल्‍य विकास सोसायटीतर्फे ही महत्त्वकांक्षी योजना राबविली जात आहे. राज्यातील वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय रुग्णालय तसेच उत्कृष्ट खासगी रुग्णालयांच्या समन्वयाने प्रशिक्षण केंद्र कार्यन्वित केले आहेत. २० हजार युवक- युवतींना प्रशिक्षणाचे उद्दिष्ट ठेवलेले असले तरी नाशिक कार्यालयास एक हजार उमेदवारांना प्रशिक्षणाचे लक्ष्य दिले आहे. त्‍यानुसार आत्तापर्यंत ८६१ उमेदवारांनी प्रशिक्षणासाठी नोंदणी केली आहे.

हेही वाचा: 3000 इंग्रजी शाळा होणार बंद? ग्रामीण भागात बिकट अवस्था

३६ प्रकारच्‍या प्रशिक्षण कार्यक्रमांचा समावेश

योजनेतून १८ ते ४५ वयोगटातील उमेदवारांना कौशल्‍य प्रशिक्षण दिले जात आहे. योजनेत हेल्‍थ केअर, ऑटोमोटिव्‍ह व डोमेस्‍टिक वर्कर अशी तीन प्रमुख क्षेत्रे निश्‍चित केली आहेत. यात हेल्‍थ केअर शाखेत पॅरामेडिकल, तंत्रज्ञ, आहार सल्‍लागार, मधुमेह सल्‍लागारसह अन्‍य ३० प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम उपलब्‍ध आहेत. ऑटोमोटिव्‍हमध्ये रुग्‍णवाहिकाचालक, डोमेस्‍टिक वर्कर क्षेत्रात वैयक्‍तिक स्‍तरावरील केअर टेकर याबाबतचे प्रशिक्षण कार्यक्रम उपलब्‍ध आहे. प्रशिक्षणानंतर त्रयस्थ संस्थेमार्फत मूल्यमापनानंतर यशस्वी उमेदवारांचे प्रमाणीकरण केले जाईल. यशस्वी उमेदवारांना रोजगार/ स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

हेही वाचा: बोहल्यावर चढण्यापूर्वी वधूने दिली ऑनलाइन परीक्षा

५३० उमेदवारांच्‍या प्रशिक्षणाला सुरवात

जिल्ह्यात नोंदणी केलेल्‍या उमेदवारांपैकी ५३० उमेदवारांना प्रशिक्षणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. सहभागींना त्‍यांनी निवडलेल्‍या क्षेत्राशी निगडित किमान दोनशे ते कमाल एक हजार तासांपर्यंतचे प्रशिक्षण दिले जाईल.

''मुख्यमंत्री महाआरोग्‍य कौशल्‍य विकास कार्यक्रमांतर्गत ८६१ उमेदवारांनी नोंदणी केली आहे. त्‍यापैकी ५३० जणांचे प्रशिक्षण सुरू आहे. रुग्‍णालये संलग्‍न होत असून, आणखी उमेदवारांना योजनेतून कौशल्‍य प्रशिक्षण दिले जाईल.'' -अनिसा तडवी, सहायक आयुक्‍त, जिल्‍हा कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र

(CM-Maha-Arogya-Skills-Development-Program-Youth-towards-the-medical-field-nashik-educational-news)

loading image