esakal | बोहल्यावर चढण्यापूर्वी वधूने दिली ऑनलाइन परीक्षा! वऱ्हाडी मंडळीमध्ये चर्चा
sakal

बोलून बातमी शोधा

bride

बोहल्यावर चढण्यापूर्वी वधूने दिली ऑनलाइन परीक्षा

sakal_logo
By
अंबादास शिंदे

नाशिक रोड : कोरोनाच्या संकटामुळे संपूर्ण देशात सध्या शाळा- महाविद्यालय बंद असून, सध्या ऑनलाइन परीक्षेची लगबग विद्यार्थ्यांच्या मागे लागली आहे. आयुष्यातील सर्वांत महत्त्वाचा आणि आनंदाचा क्षण म्हणजेच विवाह सोहळा. तेजल यांनी विवाह बंधनात अडकण्यापूर्वी तृतीय वर्षांचा वाणिज्य विभागाचा प्रथम पेपर बुधवारी (ता.१४) लग्नाअगोदर मोबाईलवर ऑनलाइन पद्धतीने दिला. (Online-exam-given-by-bride-marathi-news-jpd93)

वधूने दिली ऑनलाइन परीक्षा

कोनांबे (ता. सिन्नर) येथील भारतीय सेवा दलातील निवृत्त अधिकारी कचरू भागवत यांचे पुत्र सैन्य दलात कार्यरत राहुल व सुळेवाडी (ता. सिन्नर) येथील शेतकरी बाळनाथ जाधव यांची कन्या तेजल यांचा विवाह पळसे येथील मंगल कार्यालयात झाला. तेजल बारगावपिंप्री येथील महाविद्यालयात शिकत आहे. शिक्षण पूर्ण करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन जनतेची सेवा करण्याची इच्छा तेजल आणि राहुल यांच्यासह कुटुंबीयांनी व्यक्ती केली. वर देशाची सेवा करतो आणि वधू येणाऱ्या काळात एमपीएससीची परीक्षा देऊन राज्यात जनतेची सेवा करेल, अशी चर्चा वऱ्हाडी मंडळीमध्ये रंगली होती. या वेळी जाधव आणि भागवत परिवार तसेच आमदार सरोज आहिरे, ‘नासाका’ बचाव कृती समितीचे अध्यक्ष विलास गायधनी, माजी आमदार राजाभाऊ वाजे, योगेश घोलप, शिवाजी चुंभळे, शिवाजी फोकणे, तहसीलदार अहिरराव, अशोक डावरे आदी उपस्थित होते.

हेही वाचा: लग्नपत्रिकेवरून 'लव्ह जिहाद'चा आरोप; लग्न मोडण्याची वेळ

हेही वाचा: गाडीच्या बोनेटवर चढला मोठा साप; तरीही तब्बल 2 किमीचा प्रवास

loading image