रेकॉर्ड ब्रेक वेळेत प्रकल्प पूर्ण; मुख्यमंत्र्यांकडून अभियंत्यांचे कौतुक

cm thackeray
cm thackeray Sakal

नाशिक : कोरोना संकट काळातही रेकॉर्ड ब्रेक कालावधीत महाराष्ट्र पोलिस अकादमीतील राष्ट्रीय स्तरावर नावाजतील असे प्रकल्प पूर्ण केल्याबद्दल नाशिक सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता पद्माकर भोसले यांच्यासह अन्य अभियंत्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विशेष कौतुक केले आहे.

सोमवारी (ता.८) अकादमीत झालेल्या उद्‌घाटन कार्यक्रमप्रसंगी झालेल्या सोहळ्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता पद्माकर भोसले, अधीक्षक अभियंता शरद राजभोज, कार्यकारी अभियंता सिद्धार्थ तांबे, सहाय्यक अभियंता अविनाश देवरे आदींना मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पालकमंत्री छगन भुजबळ, पर्यटन-राज शिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे, अपर संचालक संजय कुमार, अकादमीच्या संचालिका अश्वती दोरजे, नाशिक पोलिस आयुक्त दीपक पांडेय आदींची प्रमुख उपस्थिती होती.

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे करण्यात आलेल्या निर्माण कार्याची मान्यवरांनी पाहणी केली. अवघ्या ५० दिवसात उभे केलेले येथील नवे खेळांचे मैदान, शुटींग रेंजमुळे भविष्यात पोलिसांमधून ऑलम्पिक खेळाडू घडतील असा आशावाद यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला. निसर्ग उद्यान पर्यावरणीय दृष्ट्या अत्यंत महत्वाचे असून नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी रीड बेड सिस्टीम ही काळाची गरज आहे, असं मत पर्यट मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला खासदार हेमंत गोडसे, आमदार सरोज अहिरे, सीमा हिरे, दिलीप बनकर यांच्यासह राजकीय पदाधिकारी व पोलिस अधिकारी उपस्थित होते.

cm thackeray
नाशिकच्या प्रसिध्द ‘मिसळवाल्या आजीं’ची एग्झिट; नागरिकांनी वाहिली श्रद्धांजली

या कामांसाठी झाला सन्मान

- आंतरराष्ट्रीय दर्जाचे फिफा सर्टीफाईड फुटबॉल मैदान.

- रीड बेड सिस्टीम - रोज २ लाख लिटर सांडपाणी शुद्ध करणारी आणि खर्च विरहित अशी सांडपाणी शुद्धीकरण योजना.. याअंतर्गत भूमिगत जलमल निस्सरण गटार योजनेचे काम करण्यात आले. तसेच ९५ प्रकारचे नऊ हजारापेक्षा अधिक झाडे लावून बायो डायव्हर्सिटी पार्क अर्थात निसर्ग उद्यान उभे करण्यात आले आहे.

- ४०० मीटर लांबीचा, आठ लेन असलेला सिंथेटिक रनिंग ट्रॅक

- फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल हॉकी (FIH) मानांकन प्राप्त हॉकी मैदान

- व्हॉलीबॉल आणि

- बास्केटबॉल मैदान

cm thackeray
नाशिक : घरात पेट्रोल टाकून कुटुंबाला जीवंत जाळण्याचा प्रयत्न

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com