नाशिक- सीएनजीचा पुरवठा विस्कळित झाल्याने सलग तिसऱ्या दिवशी शहरातील पंपांवर तुटवडा कायम राहिला. यामुळे बंद पंपाबाहेर एक किलोमीटरपर्यंत रांगा होत्या. प्रकल्पाच्या देखभाल-दुरुस्तीचे काम सुरू असल्याने निर्माण झालेला तुटवडा मध्यरात्रीतून सुरळीत होईल, अशी माहिती कंपनीच्या प्रतिनिधींनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. दरम्यान, सुटीच्या दिवशी रविवारी (ता. १३) वाहनचालकांचे अतोनात हाल झाले.