Nashik : ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik : ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब

Nashik : ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब

नाशिक : गेल्‍या काही दिवसांसून शहर परिसरात ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे. यामुळे वातावरणातील गारवा जणू गायब झाला आहे. दहा ते १२ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान खालावले आहे. रविवारी (ता. २१) नाशिकचे किमान तापमान २२.३ अंशांवर पोचले होते. ऑक्‍टोबर अखेरपासून हिवाळ्याच्‍या हंगामाची चाहूल लागली होती. अशात दिवाळीच्‍या काही दिवसांपूर्वी वातावरणातील शीतलहरींमुळे तापमानातही घट नोंदविली गेली होती.

हेही वाचा: पटियाला मधुन लढणार कॅप्टन अमरिंदर सिंह; म्हणाले "मी पळून..."

जिल्‍ह्यात दहा ते १२ अंश सेल्सिअसपर्यंत किमान तापमानाची नोंद झाली होती. मात्र, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला, तसेच दक्षिणेतील काही राज्‍यात अवकाळी पाऊस सुरू असल्‍याने त्‍याचा परिणाम नाशिकच्‍या वातावरणावरही जाणवत आहे. गेल्‍या काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब झाली आहे. येत्‍या काही दिवसांपर्यंत तापमानातील ही वाढ कायम राहणार असल्‍याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

हेही वाचा: लसीकरण वाढवण्यासाठी केंद्राची नवी आयडीया; लकी ड्रॉ आणि इतर उपक्रमांचा घेणार आधार

नेमका कोणता ऋतू

सध्या कोणता ऋतू सुरू आहे, याबद्दल सध्या नाशिककरांना संभ्रम होऊ लागला आहे. दिवसा काही वेळापुरते कडक उन्‍हाची अनुभूती येत असल्‍याने उन्‍हाळा वाटू लागतो. काही वेळा ढगाळ वातावरणासह अवकाळीने पावसाळा वाटतो, तर पहाटेच्‍या वेळीच्‍या गारव्‍याने हिवाळ्याची अनुभूती येत आहे. अशात सध्याच्‍या दिवसांमध्ये नाशिककर तिन्‍ही ऋतूंची अनुभूती घेत असल्‍याची स्‍थिती आहे.

काही दिवसांतील तापमान अंश सेल्सिअसमध्ये

काही दिवसांतील तापमान अंश सेल्सिअसमध्ये

loading image
go to top