Nashik Crime News: गेल्या वर्षाच्या तुलनेत भद्रकालीत गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये यंदा वाढ!

bhadrakali police station
bhadrakali police stationesakal

जुने नाशिक : भद्रकाली पोलिस ठाण्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये यंदा वाढ झाली आहे. एकूण गुन्ह्यांमध्ये मात्र घट झाली आहे. गेल्या वर्षी ६१४ गुन्ह्यांची नोंद झाली होती. तर चालू वर्षात ५५४ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. खुनाची केवळ एक घटना घडली आहे. (Compared to last year increase in serious crimes in Bhadrakali this year Nashik Crime News)

भद्रकाली पोलिस ठाणे शहरातील संवेदनशील पोलिस ठाणे म्हणून ओळखले जाते. सर्वच प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये त्यांचे वर्चस्व अधिक असल्याचा सर्वांचा समज असतो.

काही वर्षांपूर्वी ही परिस्थिती खरीदेखील होती. गेल्या अनेक वर्षांपासून मात्र परिसराची प्रतिमा बदलली आहे. त्यामुळे गुन्ह्यांमध्येदेखील घट झाली आहे. खून, खुनाचा प्रयत्न, प्राणघातक हल्ला अशा विविध प्रकारच्या गुन्ह्यांची चालू वर्ष अर्थात २०२२ ची पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या नोंदणीची आकडेवारी बघितली.

तर गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी गुन्ह्यांच्या नोंदणीत ६० घट झाली आहे. गेल्या वर्षी ६१४ गुन्ह्यांची नोंद झाली होती. तर चालू वर्षात ५५४ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. गुन्ह्यांचा आलेख कुठेतरी खाली येत असल्याचे जाणवत आहे. असे जरी असले तरी गंभीर गुन्ह्यांमध्ये मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत २२ ने वाढ झाली आहे. गेल्या वर्षात गंभीर स्वरूपाचे २०९ गुन्हे घडले होते.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

bhadrakali police station
Nashik News : अखेर विधी अभ्यासक्रमांच्या वेळापत्रकात बदल; AISFच्या मागणीला यश

तर या वर्षी २३१ घडले आहे. त्यात खून सारख्या एका गंभीर गुन्ह्याचा समावेश आहे. मद्यसेवन संदर्भातील गुन्ह्यांमध्ये मात्र यंदा प्रचंड मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. गेल्या वर्षात ११२ गुन्हे घडले होते. तर यंदा केवळ १५ गुन्हे घडले. त्याचप्रमाणे अकस्मात मृत्यू घटनांमध्ये घट झाली आहे. मनुष्य मिसिंग (बेपत्ता) नोंदणीत एक ने वाढ झाली आहे.

अशी आहे आकडेवारी

वर्ष २०२१ २०२२

गंभीर स्वरूपातील गुन्हे २०९ २३१

दुय्यम स्वरूपाचे गुन्हे ०९२ १२६

दारूबंदी संदर्भातील गुन्हे ११२ ०१५

अकस्मात मृत्यू १३२ ११२

मनुष्य मिसिंग (बेपत्ता) ०६९ ०७०

bhadrakali police station
Nashik News : भाऊसाहेब चौधरींचे नाव हटवण्यासाठी क्रेनचा वापर! शिवसैनिकांची संतप्त प्रतिक्रिया

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com