चंपाषष्ठी यात्रोत्सवाला पोलिसांची सशर्त परवानगी | Nashik

Khanderao
Khanderaoesakal

पंचवटी (नाशिक) : रविवार (ता. ५) पासून मार्तंडभैरव षड्‌रात्रोत्सवास प्रारंभ झाला. गुरुवारी (ता. ९) चंपाषष्ठी असून, त्यानिमित्त गंगाघाटावरील प्राचीन खंडेराव मंदिरास रंगरंगोटी करण्यात आली आहे. दरम्यान, येथील यात्रोत्सवाबाबत पंचवटी पोलिस ठाण्यात झालेल्या बैठकीत एकाचवेळी गर्दी न करण्यासह अन्य अटींवर परवानगी देण्यात आली आहे.

गर्दी न करण्याचे आवाहन

गंगाघाटावरील प्राचीन खंडेराव मंदिरात चंपाषष्ठीला दर्शनासाठी मोठी गर्दी उसळते. रविवारपासून षड्‌रात्रोत्सव सुरू झाला आहे. त्यानिमित्त मंदिरात रोज सकाळी अभिषेक करण्यात येत असल्याचे मंदिराचे मुख्य पुजारी बेळे गुरुजी यांनी सांगितले. याशिवाय मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाईही करण्यात आली आहे.

Khanderao
नाशिक : प्लॅस्टिक वापरल्यास खावी लागेल जेलची हवा

गर्दी, स्पीकर, बॅनर नकोत

चंपाषष्ठीनिमित्त गंगाघाटावर दर वर्षी यात्रोत्सव असतो. दोन वर्षांपासून कोरोनाच्या उद्रेकामुळे हा उत्सव मोठ्या प्राणामावर साजरा होऊ शकलेला नाही. आता राज्यात मंदिरे खुली झालेली असली, तरी कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या भीतीमुळे यात्रोत्सवाला परवानगी मिळते की नाही, याबाबत साशंकता होती. अशा पार्श्‍वभूमीवर सोमवारी पंचवटी पोलिस ठाण्यात बैठक झाली. या वेळी यात्रोत्सवास गर्दी करू नये, ध्वनिक्षेपक लावू नये, बॅनर-पोस्टरचा वापर करू नये, अशा अटींवर यात्रोत्सवास परवानगी देण्यात आली आहे.

नदीपात्रालगतच मंदिर

गोदावरीच्या उजव्या तटावर श्री खंडेराव महाराजांचे मंदिर आहे. येथे जमिनीखाली दोन ते तीन फुटांवर खंडेराव महाराजांच्या मूर्ती कोरण्यात आलेल्या आहेत. हे मंदिर नदीपात्राला अगदी खेटून असल्याने, नदीला येणाऱ्या छोट्या पुरातही ते पाण्याखाली जाते. त्यामुळे कधीकाळी केवळ चंपाषष्ठीपुरते याठिकाणी पत्रे लावून तात्पुरत्या मंदिराची उभारणी केली जात असे. आता याठिकाणी छोट्या मंदिराची निर्मित करण्यात आली आहे.

Khanderao
लग्नात नवरीचे पाहुण्यांना भन्नाट गिफ्ट, मित्रपरिवारांनी ठोकला सलाम!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com