
Nashik Political News : काँग्रेसच्या ‘हाथ से हाथ जोडो’ अभियानाद्वारे भाजपची पोलखोल!
नाशिक : काँग्रेसच्या ‘हाथ से हाथ जोडो’ अभियानाच्या माध्यमातून भाजप सरकारच्या कारभाराची पोलखोल करण्यात येत असून, या अभियानाला सर्वसामान्य नागरिकांनी चांगला प्रतिसाद देत काँग्रेसच्या मागे उभे राहण्याचा विश्वास व्यक्त केल्याचे सांगण्यात आले.
पंचवटी परिसरातील बिडी कामगार, हनुमाननगर, गंगोत्री विहार परिसरात रविवारी (ता. २९) सकाळी नऊला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व उत्तर महाराष्ट्र काँग्रेस ओबीसी विभागाचे अध्यक्ष विजय राऊत यांच्या अध्यक्षतेखाली अभियान राबविण्यात आले. (Congress Haath Se Haath Jodo campaign bjp trolled Nashik Political News)
हेही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल
खासदार राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो’ अभियानाच्या माध्यमातून देशभरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेताना केंद्र सरकारला घेरण्याचे काम केले. त्याला देशभरात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आता ‘हाथ से हाथ जोडो’ अभियानाच्या माध्यमातून घराघरांत केंद्र सरकारची चुकीचे धोरणे, महागाई, बेरोजगारी याविरोधात आवाज उठविला जात आहे.
नागरिकांचादेखील चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे पक्षाचे ज्येष्ठ नेते व उत्तर महाराष्ट्र ओबीसी विभागाचे अध्यक्ष विजय राऊत, युवक काँग्रेसचे सरचिटणीस अभिजित राऊत, आनंद मोहिते, संजय चव्हाण, हारचंद जाधव, अभिमन जाट,
अर्जुन पाझगे, दिलीप मोहिते, रवी मोहिते, भैया बोगे, आबा निकम, चंद्रसिंग महाराज, सुनीता शेळके, सरला मोहिते, मंगला जाधव, राजश्री मोहिते, सुमन चव्हाण आदींनी सांगितले. कार्यक्रमाचे आयोजन शहर काँग्रेसचे सरचिटणीस राजकुमार जेफ यांनी केले. पंचवटी ब्लॉकचे उपाध्यक्ष मांगूलाल जाधव यांनी आभार मानले.