Consumer Forum
sakal
ओझर: राज्यातील सर्व जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचामध्ये तब्बल २३६ पदे रिक्त असल्याने कामकाज विस्कळित झाले आहे. त्यामुळे ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण वेळेत न होता प्रकरणे प्रलंबित राहत आहेत. ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीचे संस्थापक, राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सचिव निधी खरे, अन्न व नागरी पुरवठा तसेच ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांना साकडे घालत सर्व रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणी केली आहे.